करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत बागल पाटील गटाचे मनोमिलन बाजार समितीच्या मिंटीगमध्ये स्व.गोवींदबापु पाटील व रमणभाई दोशी यांना श्रंध्दाजली वाहून सभा तहकूब

करमाळा प्रतिनिधी                                 करमाळा तालुक्यातील जेष्ठ नेते आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी अध्यक्ष कर्मयोगी स्व.गोविंदबापु पाटील कृषी उत्पन्न बाजारसमितीचे माजी चेअरमन स्व. रमणलाल भाईचंद दोशी‌ यांचे दुःखद निधन झाले असल्याने त्यांना श्रध्दांजली वाहुन शोकप्रस्ताव मांडल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ करमाळा  कृषी उत्पन्न बाजार समितीची सभातहकूब करून आम्ही  बाहेर पडलो आहोत. सभा तहकूब करण्याला विरोध करुन विरोधी संचालकांनी काम चालू ठेवण्याचा आग्रह  धरणे म्हणजे या लोक नेत्यांचा अवमान केला असल्याचे कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी म्हटले आहे  .सभेच्या सुरुवातीला सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी श्रंध्दाजलीचा शोकप्रस्ताव मांडला .या प्रस्तावाला संचालक दिग्विजय बागल यांनी अनुमोदन दिले असून श्रंध्दाजलीचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.या नेत्यांचा सन्मान म्हणुन सभा तहकूब करण्याचा ठराव आम्ही केला असुन  या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर ,उपसभापती चिंतामणी दादा जगताप, बाजार समितीचे संचालक दिग्विजय बागल ,आनंदकुमार ढेरे ,रंगनाथ शिंदे, ,सरस्वती केकान, अमोल झाकणे, यांच्या एकुण नऊ संचालकांच्या
  सदर  निवेदनावर सह्या आहेत. सभा तहकूब करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला असल्याचे सचिव /सहाय्यक निबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .सध्याच्या परिस्थितीत कृषी उत्पन्न.    बाजार समितीत बागल गट  व नारायण पाटील  गट  पुन्हा यावेळी एकत्र  आले असुन बागल गटाचे आठ व नारायण पाटील गटाचे दोन सदस्य आहेत. सध्याच्या परिस्थितीत बाजारसमितीवर  बागल पाटील गटाचे बहुमत यानिमित्ताने सिध्द झाले आहे. सभेची सुचना शिवाजी बंडगर व अनुमोदन संचालक दिग्विजय बागल यांनी दिले.श्रंध्दाजलीचा ठराव पारित करून या नेत्यांचा सन्मान म्हणुन सभा तहकूब करण्यात आली आहे.त्यामुळे बहुमतशिवाय  संख्येच्या अभावी त्यांनी नंतर घेतलेली सभा अथवा मिंटीग घेणे बेकायदेशीर आहे.आम्ही करत असलेल्या विकास कामांना विरोधक जाणीवपूर्वक विरोध करुन अडथळा आणण्याचे काम करत असल्याचे  कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती प्रा . शिवाजीराव बंडगर यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

जाधव-पाटील हाॅस्पिटल करमाळा येथे आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 18 व्या मुळव्याध शिबिराची यशस्वी सांगता जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये नाममात्र दरात उपचार; 115 रुग्णांचा सहभाग

  करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था…

54 mins ago

श्री कमला भवानी मंदिरात सातव्या माळेला भाविकांची अलोट गर्दी; ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला!

  करमाळा प्रतिनिधी : करमाळा येथील श्री कमला भवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त हजारो…

4 hours ago

स्त्री ही जगाची जननी; नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर सौ. स्वातीताई फंड यांचे प्रतिपादन; जिजाऊ ग्रुपच्या दांडिया महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून, ती श्रीदेवीच्या रूपाने संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करणारी माता…

9 hours ago

केत्तुरला पुणे-मुंबई एक्स्प्रेसचा थांबा द्या! उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…

1 day ago

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

    करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…

2 days ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

2 days ago