Categories: करमाळा

करमाळा विधानसभा भाजपाची निवडणूक समितीची बैठक संपन्न

करमाळा प्रतिनिधी 

करमाळा – 244, करमाळा विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी निवडणूक समितीची बैठक भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक करमाळा येथे विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे व विधानसभेच्या दृष्टिकोनातून बुथ शक्तीकरण व प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या यांचा आढावा घेण्यात आला.सर्वांनी विधानसभेचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन कामास सुरुवात करावी असे आवाहन पदाधिकारी यांना देण्यात आले,
यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीनिशी लोकसभा व विधानसभा निवडणुक लढणार असून आपण लोकसभे बरोबर विधानसभेची ही तयारी करणार आहोत व त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एक दिलाने व एक मुखाने काम करावे, तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचून त्याचा लाभ जनतेस मिळवून द्यावा आणि गरजू लोकांशी संपर्क करावा व त्यांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले, या बैठकीमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी यांनी सर्वांना आपापल्या जबाबदाऱ्या सांगितल्या तसेच संजय अण्णा घोरपडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले,
या बैठकीसाठी तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, निवडणूक समिती प्रभारी काकासाहेब सरडे, सहप्रभारी डॉ.अभिजीत मुरूमकर, संयोजक सोमनाथ घाडगे, आजिनाथ सुरवसे , जितेश कटारिया,अमोल पवार ,विनोद महानवर , लक्ष्मण शेंडगे , बिभीषण गव्हाणे, जयंत काळे पाटील,
प्रकाश ननवरे, विष्णू रणदिवे, सचिन चव्हाण , प्रियाल अग्रवाल, नितीन निकम , प्रवीण शेळके, किरण शिंदे, भैय्या गोसावी, तुकाराम भोसले , महिला आघाडीच्या राजश्री खाडे ,संगीता नष्टे , रेणुका राऊत , मस्तान कुरेशी, पवन कोठारी , प्रवीण बिनवडे, संजय किरवे, संतोष जवकर, विशाल घाडगे, कमलेश दळवी, सागर सरडे, हर्षद गाडे, सचिन चव्हाण, दादा गाडे, किरण शिंदे, प्रवीण शेळके, मस्तान कुरेशी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व चुनाव समितीचे सदस्य उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago