करमाळा प्रतिनिधी पुरस्काराने व्यक्तीची उंची वाढते पुरस्काराचे मोल ठरते. अशा पध्दतीचा ग्रामसुधार समितीचा करमाळा भूषण पुरस्कार असून प्रतिवर्षी समाजात उच्च काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या पुरस्काराने होत आहे. त्यामुळे या पुरस्काराचे आणि व्यक्तीचे दोघांचेही मोल वाढत आहे. असे मत राज्य डिजीटल मिडीया संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी व्यक्त केले.ग्रामसुधार समितीच्या वतीने देत असलेला करमाळा भूषण पुरस्कार यावर्षी आरोग्य अधिकारी व कवी डॉ.प्रदीप आवटे यांना देण्यात आला. त्यावेळी श्री. माने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे हे होते. व्यासपीठावर यशकल्याणीचे अध्यक्ष प्रा.गणेश करे- पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, उद्योजक डॉ. दिपक आबा देशमुख, वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिक्षक नम्रता रणसिंग, माधुरी आवटे, आदर्श युवा किर्तनकार लक्ष्मण महाराज झेंडे तसेच उदयसिंह मोरे-पाटील, राजेंद्र धांडे, सामाजिक कार्यकर्ते व्ही. आर. गायकवाड, ह.भ.प.मच्छिंद्र आप्पा अभंग, ॲड. अजित विघ्ने, वृक्षप्रेमी संदीप काळे, संस्थेचे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, सचिव डी. जी. पाखरे, संयोजक राजेंद्र रणसिंग, लालासाहेब रणसिंग, जालिंदर रणसिंग, शहीद नवनाथ गात समितीचे सचिव निळकंठ ताकमोगे, एन.डी. सुरवसे, डि.के. पासंगराव, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, प्राचार्य नागेश माने, केमिस्ट असोसिएशनचे सचिन साखरे, सोलापूर जिल्हा बँकेचे शाखाधिकारी आण्णा आवटे, प्रा.डॉ. संजय चौधरी,अर्जुनआबा तकीक, विठ्ठलराव शेळके,उदयसिंह मोरे-पाटील, नागनाथ लकडे, किरण कवडे, ॲड. अशोक गिरंजे, ॲड. भागडे, पै. दत्तात्रय गायकवाड, सोमनाथ पाटील, बलभिम पोटे महाराज, पत्रकार दिनेश मडके गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे, संजय हांडे, अनिल माने, संतोष माने आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना श्री. माने म्हणाले, की समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या माणसांना कधीच पुरस्काराची अपेक्षा नसते. पण अशा माणसांनाच पुरस्कार देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज असते. तेच काम ग्रामसुधार समिती करत असून समाजासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करणाऱ्या डॉ. आवटे यांना दिलेला करमाळा भूषण पुरस्कार म्हणजे नक्कीच पुरस्काराची उंची वाढवणारा पुरस्कार आहे.यावेळी गणेश करे-पाटील, नम्रता रणसिंग, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र रणसिंग यांनी केले तर आभार व्ही. आर. गायकवाड यांनी मानले. मानपत्राचे वाचन प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक रामहरी झांजुर्णे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वास रणसिंग, प्रमोद रणसिंग, गणेश रणसिंग, भरत रणसिंग, आण्णा रणसिंग, बाबू रणसिंग, अशोक बोबडे, राजेंद्र क्षीरसागर, किसन काटे, संतोष झेंडे आदींनी परिश्रम घेतले.