करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्याचे आजच्या सभेचे अध्यक्ष चंद्रकांत सरडे यांनी सांगीतले . सभेच्या प्रारंभी आदिनाथचे माजी अध्यक्ष गोविंदबापू पाटील व माजी सभापती रमणलाल दोशी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली . शोकसंदेशाचे वाचन केल्यानंतर सभापतीनी सभा तहकूब केल्याचे तोंडी सांगीतले . परंतु त्याच वेळी उपस्थित ११ सदस्यांनी सभेचे दुसरे अध्यक्ष नेमून कायदेशीर रित्या सभेचे कामकाज पार पाडण्याची सूचना सचिवांना केली . व त्यानुसार सचिवांनी सदस्यांच्या सूचनेनुसार माझी सभेच्या अध्यक्षस्थानी निवड केली व सभा पार पडली . सभापती,उपसभापती व उपस्थित सदस्यांनी प्रोसेंडींग व ठरावांवर सह्या करून उपस्थिती भत्ता स्विकारून गेले . व सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले . महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनीमयन ) अधिनीयम १९६३, नियम १९६७ व बाजार समितीच्या मंजूर उपविधीतील तरतुदीनुसार सभेचे कामकाज संपन्न झाल्याचे व आजची सभा कायदेशीर पणे पार पडल्याचे सचिव सुनील शिंदे यांनी सांगीतले . सभेस माजी आमदार जयवंतराव जगताप, संतोष वारे यांचे सह इतर संचालक उपस्थित होते .
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…