Categories: करमाळा

अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा नगरपरिषद करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय ग्राहक पंचायत व करमाळा नगरपरिषद करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ” महिला दिन ” उत्साहात साजरा झाला . 12 मार्च रोजी दुपारी चार वाजता गुरुप्रसाद मंगल कार्यालय दत्तपेठ येथे पार पडला
या प्रसंगी महिलांसाठी “सखी मेळा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. यामध्ये ग्राहक गीत,योग गीत प्रात्यक्षिक, गीता प्रार्थना ,एकपात्री नाटक, मूकाभिनय, डंब डान्स, लावणी , देशभक्ती पर गीत , राष्ट्रीय एकत्मता मुक अभिनय, नऊवारी साडी व फेटे बांधून लेझिम ,रेट्रो डान्स, रिमिक्स डान्स, दादा कोंडके रीमिक्स डान्स,सोलो डान्स, ग्रुप डान्स, तलवार डान्स, गायन, काठी work out , mother doughter dance,इत्यादी विविध रंगी कला महिलांनी सादर केल्या . प्रत्येक सादरीकरण हे एकापेक्षा एक बहारदार होते,महीला प्रेक्षकांनी शिट्या व प्रचंड टाळ्यांनी भरभरून दाद दिली, व कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, या कार्यक्रमा ला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला . कार्यक्रम पाहायला सर्व स्तरातील महिलांनी गर्दी केली होती . कार्यक्रमासाठी करमाळा नगर परिषदे चे मोलाचे सहकार्य लाभले . कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायती चे श्री शशीकांत नरुटे, श्री भीष्माचार्य चांदणे, श्री . चक्रधर पाटील, श्री निलेश कुलकर्णी, श्री शिंदे, श्री कोळेकर, श्री अशपाक सय्यद, श्री विजय देशपांडे तसेच महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ माधुरी परदेशी, सौ निलिमा पुंडे, सौ मंजिरी जोशी, सौ . ललिता वांगडे, सौ . रेखा परदेशी, सौ . सारीका पुराणिक, सौ . निशिगंधा शेंडे व सौ सुलभा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती माने यांनी केले . कार्यक्रम खूप दर्जदार झाला . खूप वर्षांनी माहिलांसाठी आपले कलागुण सादर करायला खुले व्यासपीठ मिळाल्याने महिलांमध्ये खूप आनंद व उत्साह दिसून येत होता . जागा कमी पडल्याने उभे राहून काही महिलांनी आनंद घेतला. हा कार्यक्रम फक्त महिलांसाठीच होता . यावेळी सहभागी प्रत्येक महिले स भेट वस्तू देण्यात आली .

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago