करमाळा प्रतिनिधी शांती एकता सदभावना व सलोख्याचे शिकवण देणारा रमजानचा पवित्र महिना आजपासून सुरू होत आहे या पवित्र महिन्यात मुस्लीम धर्मीय रोज पहाटे उठून रोजा(उपवास) ठेवण्यासाठी उठत असतो या साठी पाण्याची आवश्यकता भरपूर असते त्यामुळे करमाळा नगरपालिका यांनी पाण्याची कमतरता पूर्ण रमजानच्या महिन्यात कमी न पडु देता मुबलक पाणी पुरवठा करमाळा शहरातील सर्व भागात सुरळीतपणे करावा कारण करमाळा शहरात एक दिवसा आड येणारे पाणी आता दोन तीन दिवसांनी पाणी येत आहे व त्यात उन्हाळ्याचे दिवस असुन दिवसभर उपवास ठेवून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे व यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल त्यामुळे मा. राठोड साहेब मुख्याधिकारी करमाळा नगर पालिका व पाणी पुरवठा विभाग नगरपालिका यांनी योग्य असे पाण्याचे नियोजन करून किंवा वेळ प्रसंगी पाणी पुरवठा मध्ये विस्कळीत पणा झाला तर नागरिकांना पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे .
तसेच करमाळा शहर व तालुक्यातील वीजपुरवठा सहेरीच्या वेळेत पहाटे व संध्याकाळी रोजा इफ्तार उपवास सोडताना खंडीत करण्यात येऊ नये व रमजान महिन्यात होणाऱ्या त्रासापासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वीज पुरवठा विभाग करमाळा व करमाळा नगरपालिका यांनी योग्य असे नियोजन करावे अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम करमाळा यांच्या वतीने करण्यात येत आहे.यावेळी जमीर भाई सय्यद ( विश्वस्त अध्यक्ष जामा मस्जिद करमाळा), आझाद भाई शेख ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करमाळा ), रमजान भाई बेग ( सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा),सुरज भाई शेख ( सचिव रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट करमाळा) दिशान भाई कबीर ( युवक नेते ), आरबाज भाई बेग( युवक नेते ), आलिम भाई खान ( सामाजिक कार्यकर्ते ) , इम्तियाज भाई पठाण ( सामाजिक कार्यकर्ते),शाहीद बेग (सामाजिक कार्यकर्ते )उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…