Categories: Uncategorized

सिकंदर शेख आमदार केसरीचे मानकरी चांदीची गदा व ५ लाखाचे बक्षीस पटकावले

करमाळा प्रतिनिधी

           आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त करमाळा येथील जीन मैदान येथे भरविण्यात आलेल्या निकाली जंगी कुस्त्यांच्या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकत सिकंदर शेखने चांदीची गदा व ५ लाखाचे बक्षीस पटकावले. उमेश मथुरा व सिकंदर शेख यांच्यात निकाली कुस्ती झाली .या कुस्तीत सिकंदर शेख यांनी उमेश मथुरा यांच्यावर मात केली. पोलिस निरीक्षक विनोद घुगे व माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगीरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. दुसऱ्या क्रमांकाची लढत बालारफिक शेख व हर्षद सदगीर यांच्यात रंगली. बऱ्याच झटापटीनंतरही कुस्तीचा निकाल लागलाच नाही ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली .तिसऱ्या क्रमांकाची लढत पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पृथ्वीराज पाटील यांच्यात झाली ही लढतही बरोबरीत सोडविण्यात आली. या प्रमुख लढती बरोबरच सतपाल सोनटक्के व प्रसाद सस्ते, भैरु माने व विजय मांडवे , समीर शेख व कालीचरण सोलंकर, अनिल जाधव व विकास धोत्रे, प्रशांत जगताप व मनोज माने, बालाजी खरात व शशिकांत बोंगार्डे यांच्या कुस्त्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या कुस्ती मैदानात छोट्या पैलवानांच्या १०० रुपयांच्या कुस्त्यांपासून ते नामवंत मल्लांच्या ५ लाख रुपये पर्यंत च्या कुस्त्या पाहण्यासाठी जवळपास १५ हजार प्रेक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवली. दुपारी ३ वाजता सुरू झालेले हे कुस्ती मैदान रात्री ११ वाजता संपले. करमाळा तालुक्याच्या इतिहासात व सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच यावर्षी सुरु झालेल्या आमदार केसरीने कुस्ती मैदानासाठी नवी पायवाट तयार केली. मदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ. संजयमामा शिंदे मित्रमंडळाने भरवलेल्या या कुस्ती मैदानात एकास एक अशा पैलवानांच्या कुस्त्या झाल्या. यामध्ये काही महिला पैलवानांच्याही कुस्त्या झाल्या.आमदार शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, निमगाव टे चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे यांच्यासह भाजपाचे गणेश चिवटे, तानाजी भाऊ जाधव, एड. राहुल सावंत, चंद्रकांत सरडे ,नीलकंठ देशमुख राजेंद्रकुमार बारकुंड ,कन्हैयालाल देवी, अफसर जाधव, अण्णा ढाणे, आरडे तात्या ,वामन भाऊ उबाळे, कालिदास देवकर ,दिगंबर रासकर ,सचिन गायकवाड, शशिकांत पवार, विलास मुळे, नाना मोरे ,सतीश फंड, सुहास घोलप , फारुक जमादार, अभिषेक आव्हाड, मानसिंग खंडागळे बापु तांबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.या कुस्ती मैदानात पंच म्हणून विलास दादा पाटील, चंद्रहास निमगिरे, सुनील बापू सावंत, आस्लम काझी, रावसाहेब मगर, उमेश काका इंगळे,मारुती नाळे ,अनिल पवार, दादा इंदुलकर ,भारत वस्ताद ,देवा कोळेकर, अमोल गायकवाड, दादा जाधव, अमोल लावंड, गणेश साळवे ,प्रवीण हिरगुडे, राजेंद्र बिडवे, गजेंद्र कोळेकर, सचिन जगताप,जितेश कांबळे ,इकबाल इनामदार, भाऊसाहेब खरात, अक्षय पिसरे, लालासाहेब काळे आदींनी काम पाहिले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago