करमाळा व कुर्डुवाडी नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याकडून १५ कोटी तर पर्यटन व सांस्कृतिक खात्याकडून करमाळा तालुक्यातील आवाटी येथील श्रीक्षेत्र हजरत सुफीवली चांद पाशा कादरी दर्गा येथे संरक्षक भिंत बांधणे १ कोटी, संगोबा – ९० लाख, शेटफळ (नागोबाचे) – १ कोटी १० लाख,चिखलठाण -१ कोटी असा देवस्थान परिसर विकासकामी ४ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .
नगर विकास विभागाकडून निधी मधून करमाळा पालिका हद्दीतील महात्मा फुले चौक पुतळा ते जि.प.विश्रामगृह रस्ता मजबुतीकरण व स्ट्रीट लाईट बसविणे – १५० लाख,दत्त मंदिर(विकासनगर) ते नवीन न्यायालयीन इमारत रस्ता,मेनरोड व शहराअंतर्गत रस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसविणे – ४०लाख,आय.सी.आय.सी.आय बँक ते जुनी लाकडी मिल फंड गल्ली (जुना बायपास) रस्ता मजबुतीकरण करणे -१५० लाख,पालिका हद्दीत अभ्यासिका बांधणे -५०लाख,गट नं.३७८ कत्तलखाना रोड (जुना नगर रोड) बेग फकीर दफनभूमी वॉल कंपाऊंड बांधणे -३० लाख,माजी सैनिक कारगिल भवन कंपाऊंड वॉल व सुशोभीकरण करणे -३०लाख,राज्यमार्ग ६८ ते अण्णासाहेब हायस्कूल रस्ता मजबुतीकरण करणे – १००लाख,दुधे डायगणोस्टिक सेंटर ते अण्णासाहेब हायस्कूल रस्ता मजबुतीकरण करणे -५०लाख तर कुर्डुवाडी पालिका हद्दीतील टेम्भुर्णी रोडवरील बेंद ओढ्यावरील पूल बांधणे -९०लाख,करमाळा रोड येथील संजयमामा शिंदे विद्यालय ते ब्रीच कॉर्नरपर्यंत कॅनॉल गटार बांधणे-१२०लाख,पाणी पुरवठा केंद्र येथे सौरऊर्जा पॅनल बसविणे-२००लाख,कुर्डुवाडी शहरात आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविणे-८०लाख,राजमाता अहिल्यादेवी पुतळा परिसर सुशोभीकरण करणे-४०लाख
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरण करणे-४०लाख,पालिका हद्दीत आवश्यक त्या ठिकाणी काँक्रीट रस्ते करणे-२००लाख,माढा रोडवरील व्यापारी गाळे नूतनीकरण करणे-१३० लाख अशी कामे मंजूर करण्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील श्री आदिनाथ देवस्थान (संगोबा) येथे घाट बांधणे-९०लाख,शेटफळ (नागोबाचे) येथील नागनाथ देवस्थान कल्लोळ तलावास पायऱ्या बांधणे-९०लाख,शेटफळ गावठाण ते नागनाथ देवस्थान पोहोच रस्ता व मोरी बांधणे-२०लाख,चिखल ठाण -१ येथील कोटलिंग देवस्थान पोहोच रस्ता व स्ट्रीट लाईट बसविणे-१००लाख असा निधी मंजूर झाला.
आमदार शिंदे यांच्या प्रयत्नशील विकासदृष्टीमुळे आत्तापर्यंत मतदारसंघातील सर्वच गावांतील विविध विकासकामे व योजनांना कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून अनेक विकासकामे मार्गी लागली असल्याने मतदार-जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून संजयमामांच्या राजकारणविरहित सर्वांगीण विकास या कार्यपद्धतीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…