Categories: करमाळा

भाजपा करमाळा विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचे संमेलन संपन्न

करमाळा प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टी करमाळा विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचे बूथ संमेलन आज माढा लोकसभा संयोजक राजकुमार नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुप्रसाद मंगल कार्यालय येथे पार पडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवली आहे.आज प्रत्येक घरात प्रत्येक माणूस सरकारी योजनांचा लाभधारक आहे. याआधी सरकारी योजनांचे लाभधारक शोधावे लागत होते , आता लाभ न मिळालेले लोक शोधून सापडत नाहीत हेच आपल्या सरकारचे यश आहे .माढा लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षाने पुनःश्च उमेदवारी जाहीर केली आहे. गत निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. या निवडणुकीत आपले मताधिक्य आणखी वाढणार आहे. आज करमाळा तालुक्यातील आजी -माजी आमदार लोकप्रतिनिधी भाजपमध्ये सक्रिय आहेत,
याशिवाय माण,फलटण, सांगोला,माळशिरस,माढा या भागातूनही भाजपला मोठं मताधिक्य मिळणार आहे त्यामुळे यावेळीही रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राज्यात विक्रमी मतांनी निवडून येणार आहेत. त्यामुळे उपस्थित बूथ प्रमुखांनी सर्वांना सोबत घेऊन काम करावे असे आवाहन शेवटी पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, सरचिटणीस गणेश चिवटे, सचिन शिंदे, दिग्विजय बागल, शंभूराजे जगताप, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव , तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल , किरण बोकन,विधानसभा प्रभारी काकासाहेब सरडे, सहप्रभारी डॉ.अभिजीत मुरूमकर , दिपक चव्हाण, संयोजक सोमनाथ घाडगे, श्याम शिंदी ,नरेंद्र ठाकूर ,लक्ष्मण केकान ,अमोल पवार, नितीन झिंजाडे, पत्रकार दिनेश मडके,लक्ष्मण शेंडगे, बिभिषण गव्हाणे, आजिनाथ सुरवसे, सोमनाथ जाधव, दादासाहेब सरडे, सयाजी जाधव, दादा गाडे ,विष्णू रणदिवे, हरिभाऊ झिंजाडे, प्रवीण बिनवडे, धनंजय ताकमोगे, विकास काळसाईत ,गणेश तळेकर, सागर नागटिळक, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, हनुमंत रंणदिवे ,भैय्याराज गोसावी, हर्षद गाडे व भारतीय जनता पार्टीचे सुपर वॉरियर्स, बुथ प्रमुख व पदाधिकारी आदी उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवानगिरी गोसावी यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष उमेश मगर यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

5 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

22 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago