Categories: करमाळा

पक्षनिष्ठा जोपासणाऱ्या प्रियांका गायकवाड यांची करमाळा शिवसेना महिला तालुका प्रमुखपदी पुनश्च नियुक्ती


करमाळा प्रतिनिधी – करमाळा येथील प्रियंका गायकवाड यांचे आजपर्यंतचे पक्ष कार्य पाहून तसेच सर्वसामान्याला न्याय देणारे नेतृत्वगुण पाहून पक्षाने त्याना पुन्हा एकदा करमाळा शिवसेना महिला तालुका प्रमुख पदी नियुक्ती केली असून मुंबई येथील अधिकृत कार्यालय बाळासाहेब भवन येथून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
मागील आठवड्यात त्रयस्थ महिलेची करमाळा तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती तशा आशयाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु पक्ष नेतृत्वाने पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या व प्रामाणिकपणे पक्ष बांधणी करणाऱ्या गायकवाड याना न्याय देत तालुका प्रमुख पदावर पुनश्च नियुक्ती केलेली आहे. सदर नियुक्ती ही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना सचिव संजय मोरे, महिला सचिव तथा आमदार मनिषा कायंदे यांच्या हस्ते व तालुका संपर्क प्रमुख रवि आमले यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सदर नियुक्ती करण्याच्या अगोदर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्याशी वरिष्ठांनी चर्चा करीत निर्णय घेत नियुक्तीपत्र दिले.
गायकवाड यांच्या पुनश्च नियुक्तीने निष्ठावंत शिवसैनिकात आनंदाचे वातावरण असून सर्वसामान्य नागरिकांनी निवडीबद्दल समाधान व्यक्त करीत गायकवाड याना शुभेच्छा दिल्या.
यावेळी करमाळा उप तालुका प्रमुख सुभाष पाटील, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, आदि उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

3 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

21 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago