Categories: करमाळा

श्री अतुल (भाऊ)पाटील यांना ‘मल्हाररत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल जेऊर ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार…

करमाळा प्रतिनिधी होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 33 व्या जयंती निमित्त पुण्यश्लोक फाऊंडेशनच्या वतीने रविवारी पंडित नेहरू सांस्कृतिक सभागृह पुणे येथे ‘मल्हाररत्न पुरस्कार’ प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी डबल उपमहाराष्ट्र केसरी तथा करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल(भाऊ)पाटील यांना ‘मल्हाररत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर,ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस पुणे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे,कार्यक्रमाचे संयोजक धनंजय तानले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.याबद्दल ग्रामपंचायत जेऊरच्या वतीने सभापती अतुल(भाऊ)पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मा.आ.नारायण(आबा)पाटील स्वतःहा उपस्थितीत होते.त्यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल कुमार गाडिया,लोकनियुक्त सरपंच पृथ्वीराज पाटील,उपसरपंच नागेश झाजूर्णे ,प्रवक्ते सुनील तळेकर,मा.उपसरपंच धनंजय शिरस्कर,मा.सदस्य विनोद गरड,ग्रा.पं.सदस्य उमेश कांडेकर, मा.सरपंच भारत साळवे,मा.ग्रा.सदस्य हंबीरराव चव्हाण ,ग्रा.पं.सदस्य राकेश गरड,मा.सदस्य बापूसाहेब घाडगे,राजू गरड,धनंजय घोरपडे,मा.सदस्य मुबारक शेख,सोसायटी व्हाईस चेअरमन महेश कांडेकर,बहुजन संघर्ष सेनेचे गरड,ग्रा.पं.सदस्य शांताराम सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

4 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

21 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago