Categories: करमाळा

लोकसभा असो वा विधानसभा, नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना हि माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर-सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी लोकसभा असो वा विधानसभा, नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना हि माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर असल्याचे ठाम प्रतिपादन पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेऊर ता.करमाळा येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील जनमताचा कौल‌ जाणुन घेण्यासाठी पाटील‌ गटाकडून बैठकींचे सत्र चालू असुन अद्यापपर्यंत तीन बैठकांमध्ये साठ गावातील‌ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. आज चौथी बैठक पार पडली.यावेळी पोथरे, नीलज, कामोने, खडकी, आळजापूर, जातेगांव, पुनवर, वडगाव दक्षिण, वडगाव उत्तर, मांगी, भोसे, रायगाव, वंजारवाडी, कुराणवाडी, लिंबेवाडी, बिटरगाव श्री,हिवरवाडी,घारगाव,तरटगाव, बाळेवाडी,पाडळी, बोरगाव, दिलमेश्वर,पोटेगाव, वाघाचीवाडी, वीट, अंजनडोह, उमरड, सोगाव पूर्व , मांजरगाव, रिटेवाडी, पोंधवडी, विहाळ, मोरवड, रोशेवाडी, पिंपळवाडी, झरे गावातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मते मांडली.या बैठकीत पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक यांनी मार्गदर्शन केले. तर माजी पं.स.सदस्य अशोकदादा पाटील, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे,   सभापती अतुल पाटील, उपसभापती दत्ता सरडे, माजी सभापती शेखर गाडे, जि प सदस्य बिभीषण आवटे, सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसभापती गणेश चौधरी, नेमीनाथ सरडे, रामभाऊ नलवडे, विलास बरडे, बाजार समिती माजी संचालक बाबासाहेब बोरकर यांनी सर्व‌ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भुमिका जाणुन घेतल्या. तर नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना हि माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांची संकल्पना असुन या शिवाय मतदार संघातील काही प्रलंबित प्रश्न समोर ठेऊनच माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे लोकसभा निवडणुकीत सुध्दा आपली भुमिका स्पष्ट करतील. उमेदवारी आणि पाठींबा या बाबी अगोदर विकासकामे हाच या पाटील गटाचा निवडणुकीतील मुळ मुद्दा असल्याचे तळेकर यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रास्ताविक सोशल मीडिया तालूका प्रमुख संजय फडतरे यांनी केले तर आभार वाॅर रुम प्रमुख योगेश खंडागळे यांनी मानले. सुत्रसंचलन बाबासाहेब कोपनर यांनी केले. या बैठकीचे नियोजन एन पी मिशन २०२४ यांच्यावतीने करण्यात आले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

19 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago