Categories: करमाळा

प्रा.प्रदिप मोहिते बहुआयामी व्यक्तिमत्व- विलासरावजी घुमरे सर

करमाळा प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविण्यासाठी प्राध्यापक प्रदीप मोहिते यांचे कार्य ‌ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी‌ असुन बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले प्राध्यापक प्रदीप मोहिते विद्यार्थी यशवंत परिवाराच्या ‌कायम स्मरणात  राहतील असे मत विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांनी व्यक्त केले. विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील मराठी विषयाचे विभागप्रमुख प्रा.प्रदिप मोहिते यांचा निरोप समारंभ 01/04/2024 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे सचिव आदरणीय श्री विलासरावजी घुमरे (सर ) , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व सर्व मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने प्रा.प्रदिप मोहिते यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की प्रा.मोहिते सर हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून कोणत्याही क्षेत्रात अतिशय नैपुण्यपणे काम करण्याची त्यांची तयारी असते. असे विचार मांडले. विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय,टेंभूर्णीचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी मोहिते सरांनी लिहीते झाले पाहिजे असे मत व्यक्त केले .डॉ. कवी राजेंद्र दास मनोगतातून प्रा. मोहिते सर यांना पीएच.डी. करण्यापेक्षा आपले विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लिहीणं गरजेच आहे असे मत व्यक्त केले. यावेळी तहसीलदार सुषमा पैकेकरी मॅडम , सामाजिक कार्यकर्ते प्रमोदजी झिंजाडे, मोहिते सरांचे गुरु किलकिले सर , प्रा.सौ.संगिता मोहिते-पैकेकरी, मदार चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर या मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले व मोहिते सरांच्या आठवणीना उजाळा दिला .या सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रा. मोहिते सरांविषयीचे आपले विचार व्यक्त केले. त्याचबरोबर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी यांनी प्रा.मोहिते सरांविषयीचे आपले विचार व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ही मोहिते सरांविषयीचे व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील यांनी प्रा. मोहिते सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कारास उत्तर देताना प्रा. मोहिते यांनी मी सर्वांचा आदर्श असलो तरी माझे आदर्श श्री विलासराव घुमरे सर आहेत असे उद्‌गार काढून महाविद्यालय व संस्थेविषयी ऋण व्यक्त केले. महाविद्यालयामध्ये व विदयार्थ्यांमध्ये मोहीते सर बाबा या नावाने परिचीत आहेत .या कार्यक्रमासाठी यशवंत परिवारातील सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, त्याचबरोबर प्रा.मोहिते सर यांचे दिवे,सासवड गावचे पोलिस पाटील, वर्गमित्र व गावकरी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

3 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

3 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

1 day ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago