Categories: करमाळा

दुष्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा 147कोटीचे वाटप होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेतकरी मानतायत आभार जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या पाठपुराव्याला यश

करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यांवर  दुष्काळी निधी  पैसे जमा करण्यास सुरुवात केल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.करमाळा तालुक्यासाठी 147 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे दोन सर्कलच्या याद्या पूर्ण झाल्या असून ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेबारा हजारापासून ते 36 हजार पर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत आहेएक हेक्टर ची मर्यादा वाढवून तीन हेक्टर मर्यादा केल्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस निधी मिळत आहेगेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होतेसोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकऱ्यांना दोन महिन्यापूर्वीची नुकसान भरपाई मिळालेली आहे मात्र करमाळ्याच्या याद्या प्रलंबित होत्या.यासाठी करमाळा दौऱ्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे आल्यानंतर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी हा निधी तात्काळ वितरित करण्याची मागणी केली होतीत्याचप्रमाणे यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आतापर्यंत इतिहासात करमाळा तालुक्याला एवढी मोठी कधीच नुकसान भरपाई मिळाली नव्हती ती मिळाल्यामुळे शेतकऱ्याचा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पैसा हातात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे

++—-

राजेंद्र मिरगळ
अनुदान प्राप्त शेतकरीमला काल नऊ हजार आठशे रुपये अनुदान प्राप्त झाले असून माझ्यासोबत माझ्या भाऊव नातेवाईकांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या पिकाच्या नुकसानीची भरपाई असे मिळून जवळपास 50 ते 60 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहेआज पर्यंत एवढी मोठी नुकसान भरपाई कधीच मिळाली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार—                                           –संजय वाकडे तालुका कृषी अधिकारी.                          नुदान वाटपाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेतआता आधार कार्ड ला थेट बँक अकाउंट नंबर जोडला असल्यामुळे बँक अकाउंट नंबर द्यायची गरज नाही.मात्र केवायसी तात्काळ करून घेतल्यानंतर दहाच मिनिटात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

2 days ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

2 days ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

2 days ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

3 days ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

3 days ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

4 days ago