करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील नगरपालिकेच्या जुने बोअरवेल (विंधन विहीर) दुरुस्त रिबोअर करून पाणीटंचाई दुर न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषदेस निवेदनाद्वारे नगरसेविका सौ स्वातीताई महादेव फंड यांनी दिला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उजनी मायनसमनध्ये गेल्यामुळे करमाळा शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. करमाळा शहरामध्ये अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. करमाळा शहरास तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे.करमाळा नगरपरिषदेने करमाळा शहरातील विविध भागामध्ये बोअरवेल (विंधन विहिर) घेतलेले आहेत. सदरचे बोअरवेल सद्य स्थितीत काही भागामध्ये कार्यरत आहेत. तर काही भागातील बोअरवेल नादुरुस्त आहेत. सदर नादुरुस्त बोअरवेल तेथील मोटार व बोअरवेल रिबोअर करुन तात्काळ चालु करण्यात यावेत. व त्याठिकाणी नविन सिंटेक्सच्या पाण्याची टाकी बसविण्यात यावेत. त्यामुळे शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.याबाबत आपण अधिकाऱ्यांना वारंवार समक्ष भेटून तोंडी सांगून सुध्दा याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर करमाळा शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागला नसता. तरी आपण लवकरात लवकर शहरातील नादुरुस्त बोअरवेल दुरुस्त करुन होणारी पाणी टंचाई दूर करावी. अन्यथा करमाळा नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात असे दिलेल्या निवेदनात नगसेविका स्वातीताई महादेव फ़ंड यांनी म्हटले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…