Categories: करमाळा

वीज पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती


करमाळा प्रतिनिधी
उजनी धरणावरती सोलापूर ,पुणे आणि अ.नगर या ३जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे भवितव्य धरणातील पाण्यावरती अवलंबून असते. टंचाईची परिस्थिती लक्षात घेता उजनी बॅकवॉटर क्षेत्रातील शेती पंप तसेच पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा हा कमी करण्यात आला होता. हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे ,माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, आमदार जयकुमार कोरे , सोलापूर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या समवेत आपण काल दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी भेट घेतली असून उजनीच्या परिसरातील विजेची समस्या त्यांच्यासमोर मांडली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की, उजनी धरणाच्या पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी बारमाही पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली असून त्यासाठी किमान ८ तास वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. सदर वीज पुरवठा कमी केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून शेतकरी संकटात सापडणार आहे .सदर बाब लक्षात घेऊन शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापुढे ही समस्या मांडली असून लवकरच सोलापूर, नगर आणि पुणे या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेऊन यावरती तोडगा काढू असे आश्वासन ना.फडणवीस साहेब यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
शेतीसाठी ८ तास वीज पुरवठा व्हावा, भीमा नदी बंधाऱ्यावरील पाणीपुरवठा योजनांना होणारा वीज पुरवठा, ग्रामीण तसेच शहरी भागातील टँकर द्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा याविषयी या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago