मैत्रीचे अतूट नाते जपणारी ईश्वर आणि विजय यांची जोडी करमाळा तालुक्यातील अतुट मित्राची जोडी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे ते म्हणजे रोशेवाडी चे ईश्वर चव्हाण व श्रीदेवीचा माळ येथील रहिवासी विजय चव्हाण ईश्वर चव्हाण यांचा सुभाष चौकामध्ये रेडिमेड कपड्याचा फिरता व्यवसाय असून विजय चव्हाण ही दैनिक लोकमतची गेल्या 30 वर्षापासून पेपर एजंट आहे दोघेही आपल्या व्यवसायामध्ये इमानी ईदबारे काम करून आपले जीवन जगत आहे .ईश्वर चव्हाण यांना पत्नी दोन मुली एक मुलगा तर त्यांचे मित्र विजय चव्हाण यांना एक मुलगा व एक मुलगी पत्नी असा परिवार आहे दोघांनीही आपल्या व्यवसायावरच मुलांची शिक्षण पूर्ण केले आहे .कुठलेही प्रकारची व्यसन नसल्यामुळे हे दोघेही आपल्या जीवनामध्ये सुखी संपन्न आयुष्य जगत आहे आपले काम हीच खरी पूजा असून श्रम प्रतिष्ठेला महत्त्व देऊन नागरिकांशी दिवाळीचे प्रेमाचे नाते जोडून जनसामान्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे . जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जमीन जुमला पैसा पद प्रतिष्ठा या गोष्टी महत्त्वाच्या नसून प्रामाणिकता नीतिमत्ता कष्ट करण्याची तयारी व आपल्या कामावर असणारी निष्ठा नक्कीच आपल्या जीवनामध्ये यशाची गुरुकिल्ली आहे.आपल्या जीवनामध्ये गरजा कमी करून चैन न करता व्यसन न करता नियोजनबद्ध जीवन जगले तर कुठलीही अडचणी येत नाही हे यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य आहे.कुणाची स्पर्धा करण्यापेक्षा परमेश्वराने आपणास जे दिले आहे.त्यात समाधान मानुन काम केल्यास काही कमी पडत नसल्याचे या जोडीचे म्हणणे आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून यांची मैत्री लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे ऊन वारा पाऊस बस की कुठलीही परिस्थिती असो आपले काम करून कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारी ईश्वर आणि विजय यांची जोडी करमाळा तालुक्यातील जय वीरूची जोडी म्हणून प्रसिद्ध होत आहे.