Categories: करमाळा

संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत उद्योजक विजय दादा पवार यांचे कार्य प्रेरणादायी -ॲड बाबुराव हिरडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये विजयदादा पवार यांनी संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत सामाजिक चळवळीत योगदान देण्याचे काम केले असून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले. करमाळा येथील शुभ सकाळग्रुपच्या वतीने विजयदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी पुढे बोलताना एडवोकेट बाबुराव हिरडे म्हणाले की विजयदादा पवार यांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्पेअर पार्ट दुकानापासून सुरुवात करून त्यानंतर जे सी बी, पोकलेन जे के टायर एजन्सी अशा व्यवसायामधुन उत्कर्ष केला.सामाजिक बा़धिलकीतून मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे . तसेच शैक्षणिक क्षेत्रात रणजितसिंह मोहिते पाटील महाविद्यालय स्थापना करून करमाळयातील होतकरू विद्यार्थ्यांना बी सी ए.बी.बी ए बी एससी कोर्स चालू केले.त्याचप्रमाणे राजकारणामध्ये. लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या बरोबर काम केले आहे.याचबरोबर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बरोबर काम करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम केले.त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष म्हणून काम केले. हे काम करताना कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाबीजवर संचालकपदी निवड केली होती. राजकारणात सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे .कुणाच्या छत्राखाली काम करण्यापेक्षा स्वाभिमानाने आत्मनिर्भर तिने गोरगरिबाची कामे स्वबळावर करण्यासाठी दादा सदैव कार्यरत राहिले आहे.त्यानी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सर्व जाती धर्माचे मित्रपरिवारावर त्यांचे प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विजयदादाचे जवळचे नातेसंबंध मित्रत्वाचे संबंध आहे. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.अनेक लोकांची निस्वार्थपणे कामे त्यांनी केली आहेत त्यांचे कार्य करमाळा तालुक्यातील जनतेसाठी व पिढीसाठी प्रेरणादायी आहे. स्वाभिमानी प्रामाणिकपणे काम करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिल्यास समाजाचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही असे ॲड बाबुराव हिरडे यांनी सांगितले .या सत्कार समारंभास उद्योजक मनोज गांधी डॉक्टर अनिल मेहता उद्योजक बाळासाहेब रोडे महेश गवळी, पत्रकार दिनेश मडके, उद्योजक शिवकुमार चिवटे, सिध्देश्वर डास यांच्यासह करमाळा शुभ सकाळ ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago