परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण देण्याच्या क्षेत्रामध्ये अकल्पनीय काम करणारी संस्था म्हणून संपूर्ण भारतामध्ये विख्यात असणाऱ्या आत्मीय एज्युकेशन, पुणे या संस्थेद्वारे रविवार दिनांक 07-04-2024 रोजी पत्रकार भवन, पुणे येथे दुपारी 2 वाजता “इन्स्पायरिंग मेंटॉर अवॉर्ड 2024 (INSPIRING MENTOR AWARD 2024″) हा बहुप्रतिक्षित पुरस्कार देऊन प्रा महेश निकत यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार श्री. हेमचंद्र शिंदे सर संस्थापक अध्यक्ष, करिअर मार्गदर्शन केंद्र, बारामती,डॉ. अमोल शशिकांत शहा (M.Pharm,Ph.D) प्राचार्य, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली.), शिरूर प्रा. डॉ. अजित अशोकराव चांदगुडे प्राचार्य, वाणिज्य विज्ञान आणि संगणक शिक्षण महाविद्यालय, माळेगाव डॉ. शिंदे पोपट कृष्णा M.Com, NET, GDC&A, Ph.DAssistant Professor in S.P. College, Pune डॉ. राहुल प्रतापसिंग पाटील (एम.एस्सी. पीएच.डी.) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाधीरे महाविद्यालय, ओतूर, ता. जुन्नर जि.पुणे तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. नीरजकुमार शाह B.E Civil, M.tech (CPM) Gold medal आत्मिय एज्युकेशन, पुणे यांच्या हस्ते देण्यात आला.या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील शिक्षण, उद्योग, सरकारी, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रामध्ये निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करण्यात आला .यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले की शैक्षणिक संस्था म्हणून आत्मीय एज्युकेशनचा हा विश्वास आहे कि”समाज आदर्शवादी तेव्हाच बनतों जेव्हा समाजासमोर चांगले आदर्श असतील !”. आणि हि आमची जबाबदारी आहे कि आजच्या “यंग इंडियाला इन्स्पायर करणाऱ्या या आदर्शाचा.. मैटौर्सचा आम्ही सत्कार करायला हवाय तैव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही समाजप्रती असणाऱ्या आमच्या जबाबदारीमधून मुक्त होऊ शकू..
आणि तुमच्या सारख्या आदर्शयांचा कार्याला विश्वासाचे बळ देऊ शकू.. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हा पुरस्कार आमच्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या सर्व विद्यार्थ्यांना, पालक व शिक्षकाना समर्पित करत आहोत असे प्रा. निकत यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…