Categories: Uncategorized

मा.आमदार जयवंतराव.जगताप आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत नुरानी मस्जिदमध्ये ईफ्तार पार्टी संपन्न

करमाळा प्रतिनिधी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील पंजाब वस्ताद चौकातील नुरानी मस्जिद येथे अल -कुरेश यंग ग्रुपच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप , आमदार संजयमामा शिंदे ,माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या प्रमुख उपस्थितित ईफ्तार पार्टी संपन्न झाली . याप्रसंगी करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे , माजी उपनगराध्यक्ष ॲड कमलाकर वीर , माजी नगरसेवक अजितसिंग परदेशी , दादाराम लोंढे , दिगंबर रासकर , ॲड नवनाथ राखुंडे , जोतिराम ढाणे यांचे सह शहरातील आजी माजी नगराध्यक्ष , नगरसेवक , प्रतिष्ठीत नागरीकांसह अधिकारी ,पदाधिकारी व हिंदू -मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . उपस्थितांचे स्वागत माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी , नगरसेवक नजीर अहमद शेख यांचेसह अल -कुरेश यंग ग्रुपच्या सदस्यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्तविक युसूफ शेख यांनी तर आभार अनिस बागवान यांनी मानले .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago