करमाळा प्रतिनिधी मांगी येथे दिग्विजय बागल सार्वजनिक वाचनालय मध्ये पुस्तकांची गुढी उभा करून मराठी नववर्ष दिन गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. या नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी बोलताना सुजित तात्या बागल म्हणाले की, ग्रामीण भागातील दोन मजली इमारत असलेलं करमाळा तालुक्यातील हे एकमेव प्रशस्त ग्रंथालय असून या ग्रंथालयाला या वर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त गावातील नागरिकांना, तरुणांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून वाचन परंपरेच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाचनाची गुढी हा उपक्रम आज आम्ही राबविला.
दिग्वीजय बागल सार्व वाचनालयाची स्थापना 1997 मध्ये झाली असून सध्या वाचनालयाला ब वर्ग मिळालेला आहे . वाचनालयात 10000 ग्रंथ संपदा उपलब्ध असून यावर्षी वाचनालयाला 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. हे ग्रामीण भागामधील एकमेव ब वर्गाचे वाचनालय असून वाचनालय मध्ये गावातील तरुणांना अभ्यास करण्यासाठी 30 विद्यार्थ्यांची स्वतंत्र अभ्यासिका तयार करण्यात आलेली आहे तसेच वाचनालयाच्या परिसरामध्ये प्रसन्न असं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…