करमाळा प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी करमाळा येथे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांचे निवासस्थानी भेट घेतली . यावेळी जगताप गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यामध्ये प्रामुख्याने शेतकरी ,व्यापारी, मराठा ,मुस्लिम व दलित समाजाचेसमाजाचे कार्यकर्तेची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे नामदार चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण व मुस्लिम समाजाचे देशातील असलेली सुरक्षितता तसेच दलित समाजात घटनेबद्दल पसरवले जात असलेले गैरसमज सीएए कायदा यावर भाष्य करीत सविस्तर स्पष्टीकरण देत अभ्यास पूर्ण विवेचन केले . नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन उपस्थित जनतेला केले .भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या कार्याचा गौरव करीत उद्याचे करमाळा तालुक्याचे भावी युवक नेतृत्व असा आवर्जून उल्लेख यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला .यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप व शंभूराजे जगताप यांनी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. याप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आमदार संजय मामा शिंदे ,माजी आमदार प्रशांत परिचारक ,भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक ,तालुक्यातील विविध गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य ,विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व सदस्य यांचे सह जगताप गटावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन दत्तात्रय भागडे यांनी केले .आभार करमाळा नगर परिषदेची माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप यांनी व्यक्त केले .