करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण कार्यरत असून शेतकरी ,कामगार, सर्वसामान्य जनता,विद्यार्थी यांच्या सेवेसाठी आपण कार्यरत राहुन करमाळा तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा रामदास झोळ मित्र परिवाराच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करमाळा येथील बारा बंगले या ठिकाणच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले होते.
ज्ञानप्रबोधन मतिमंद विद्यालय कोर्टी या शाळेमध्ये मिष्टान्न भोजन देण्यात आले तसेच मुक्या प्राण्यांच्या पक्षाच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी वनविभागातील पाणवठे टॅंकरद्वारे भरवुन देण्यात आले असून करमाळा तालुक्यातील दहा गावात 52 बाकडे बसवण्यात आले आहे.पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. रामदास झोळसर म्हणाले की करमाळा तालुक्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाची एकही संस्था कार्यरत नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींची कुचंबना होत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात एक उत्तम शैक्षणिक संकुल उभारणार असल्याचे सांगितले. त्यासाठी करमाळा ते देवळाली परिसरात जमीन खरेदी केलेली आहे. वैद्यकिय अभ्यासक्रम तसेच व्यवस्थापन व संगणकीय अभ्यासक्रम करमाळा तालुक्यात उपलब्ध नाहीत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुका सोडून बाहेर जावे लागते. यामुळे गरीब विद्यार्थ्यांना तसेच मुलींना शिक्षणा पासून वंचित रहावे लागते. ही बाब आम्ही लक्षात घेऊन तालुक्यात असे शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टीने संस्थेने विचार केला आहे. त्यानुसार देवळाली परिसरात की जी जागा शिक्षणासाठी सर्वांना उपयुक्त होईल; अशी खरेदी केलेली आहे. लवकरच शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात येईल; असेही प्रा. झोळ यांनी सांगितले. प्रा. रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून सत्कार करून फोनद्वारे सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…