Categories: करमाळा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य,महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस विद्या विकास मंडळचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रा.नितीन तळपाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार थोडक्यात सांगून डॉ. आंबेडकरांच्या विचाराचे अनुकरण करावे हीच खरी जयंती साजरी केल्यासारखे होईल असे विचार मांडले.महाविद्यालयातील कार्यक्रम संपल्यानंतर करमाळा शहरातील भाजीमंडई जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस यशवंत परिवाराच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago