Categories: करमाळा

मोहिते पाटील यांच्या साठी स्वतंत्र समांतर प्रचार यंत्रणा राबवणार- चिंतामणीदादा जगताप

करमाळा प्रतिनिधी 
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत असलेले धर्यशील भैय्या मोहिते -पाटील यांच्या करमाळा तालुक्याच्या प्रचारासाठी स्वतंत्र, समांतर यंत्रणा राबवणार असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा नामदेवराव जगताप यांनी केले. पुढे बोलताना श्री जगताप म्हणाले की काँग्रेस आय पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आणि इतर सहकारी पक्ष या सर्व पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करमाळा तालुक्यातील ११८ गावे आणि वाड्या- वस्त्यापर्यंत पोहचून भाजपचे हुकूमशाहीचे धोरणाविराधात तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक गावातील मतदारांना समजावून सांगून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन करणार आहोत.
महाविकास आघाडी व सर्व मित्र पक्ष यांना सोबत घेऊन करमाळा तालुक्यातील असणाऱ्या सर्व सामाजिक संघटना, शेतकरी उत्पादक कंपनी,विविध कार्यकारी सेवा संस्था, महिला बचत गट, वाचनालय संस्था, सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, अशा सर्व संस्था व संघटनेच्या चेअरमन, सर्व पदाधिकारी व प्रत्येक सभासदांना समक्ष भेटून माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील भैय्या मोहिते- पाटील यांनाच मतदान करण्यासाठी विनंती करणार आहोत.
सदर स्वतंत्र,समांतर प्रचार यंत्रणा उभी करण्याचा मुख्य हेतू भाजपाच्या चुकीच्या असणाऱ्या धोरणासाठी आहे. या लोकसभा निवडणुकीपुरतीच ही व्हूवरचना असल्याचे श्री. जगताप यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा आणि सोलापूर असे दोन लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये यशवंतरावजी चव्हाण सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेनुसार किमान 42 हजार लोक करमाळा तालुक्याशी निगडित आहेत की ज्यांचा रोटी
बेटीचा व्यवहार झालेला आहे. या सर्व 42000 मतदारांचे नाव,मोबाईल नंबर आमच्याकडे उपलब्ध असून त्यांना समक्ष भेटून किंवा त्यांच्याशी संपर्क साधून सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांनाच मतदान करण्याचे आवाहन करणार आहोत. त्याच पद्धतीने धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये किमान 22 हजार लोक असे आहेत की त्यांचाही रोटी-बेटीचा व्यवहार करमाळा तालुक्याची निगडित आहे अशा सर्व मतदारांना देखील धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनाच मतदान करण्याचे आवाहन करणार आहोत.
शेवटी बोलताना श्री. जगताप म्हणाले की मोहिते- पाटील भाजप सोडून भाजपा समोरच मोठे आव्हान निर्माण करतील असं कुणालाच वाटत नव्हतं परंतु ज्याअर्थी हे धाडस मोहिते- पाटलांनी केले यामुळे समाजातील सर्व स्तरातील मतदाराकडून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. ज्या- ज्या घटक पक्ष, सामाजिक संघटना, यांना भाजपाच्या असणाऱ्या चुकीच्या धोरणावरती राग आहे त्या सर्वांना एकत्रितपणे घेऊन करमाळा तालुक्यातील 118 गावातील असणाऱ्या 240 बूथ पर्यंत पोहचून पदयात्रा, घोंगडी बैठक, कॉर्नर सभांच्या माध्यमातून सर्व मतदारांना आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन न करता महा विकास आघाडीचे महत्त्व पटवून देऊन माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील भैय्या मोहिते -पाटील यांनाच मतदान करण्यासाठी महाविकास आघाडीच्या मित्र पक्षा बरोबरच तालुक्यातील सर्व गटाच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकारी यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न करून प्रचार करणार असल्याचे शेवटी श्री चिंतामणीदादा जगताप यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

12 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

13 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

1 day ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago