करमाळा प्रतिनिधी
2023 मध्ये अत्यल्प प्रमाणात करमाळा तालुक्यात पाऊस पडल्यामुळे 2024 च्या उन्हाळ्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक स्वरूपामध्ये जाणवत आहे. विविध गावांना पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागातील गावांना भीषण पाणीटंचाईच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. विविध गावातून टँकरची मागणी होऊ लागली आहे, टँकर मंजुर होत आहेत ,परंतु टँकर भरण्यासाठी आवश्यक असलेले जलस्त्रोत आटल्यामुळे जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू व्हावी या संदर्भात आपण जिल्हाधिकारी सो यांना पत्र व्यवहार केला व या योजनेच्या दुरुस्तीसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
मंजुर निधीमधून योजनेची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली. 29 गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे विज बिल थकल्यामुळे योजना सुरू होणे अडचणीचे होते.या संदर्भातही आपण मार्ग काढून जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे .त्याची ट्रायल यशस्वी झाली. 20 एप्रिल पर्यंत पाणी वरकटणे चौफुला येथील टाकीत दाखल होईल. त्या ठिकाणाहून दुष्काळी पट्ट्यातील टँकर भरण्यासाठी तो फिडर पॉईंट म्हणून आपल्याला वापरता येईल. जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमुळे टँकरच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…