Categories: करमाळा

राष्ट्रहितासाठी व सर्व धर्मांच्या संरक्षणासाठी मोहिते पाटील यांचाच प्रचार करणार :- सौ. रजनीताई पाटील


करमाळा प्रतिनिधी :- देशा मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने करमाळा तालुक्याच्या काँग्रेस आय महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक करमाळा तालुका काँग्रेस आय महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. रजनीताई पाटील यांच्या अध्यक्षते खाली व शहराध्यक्षा सौ.अरुंधती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये काँग्रेस आय महिला आघाडी करमाळा तालुका अध्यक्षा सौ. रजनीताई पाटील म्हणाल्या की आमचे मार्गदर्शक करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री चिंतामणी दादा जगताप व काँग्रेस आय कमिटी करमाळा तालुका अध्यक्ष श्री प्रतापराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रहितासाठी तसेच सर्व धर्मांच्या संरक्षणासाठी जातीयवादी सत्ता उलथून टाकून देशात पुन्हा एकदा सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या ‘ इंडिया ‘ आघाडीची सत्ता येणे गरजेचे आहे व त्यासाठीच माढा लोकसभेचे उमेदवार मा.धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या प्रचारासाठी अचूक नियोजन करून जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शाहीनताई शेख व मा. शितल देवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा तालुक्यातील असणाऱ्या सर्व पंचायत समिती गणांमध्ये व करमाळा शहरात हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक गावामध्ये पदयात्रा काढून मा. धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा जोमाने प्रचार करणार असल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षांमध्ये देशामध्ये महागाईने हाहाकार माजवला असून या महागाईचा प्रत्येक महिलेला सामना करावा लागतोय. भाजपाच्या चुकीच्या धोरणाचा फटका हा सर्व सामान्य जनतेला नाहक सहन करावा लागतोय. यामुळेच प्रत्येक पंचायत समिती गण करमाळा शहरातील प्रत्येक प्रभागात मध्ये जाऊन
” आपल्या सर्वांची हमी……
माढ्यातून एक कमळ कमी ” हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील भैया मोहिते- पाटील यांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे सौ.रजनीताई पाटील यांनी सांगितले. सदरच्या बैठकी करीता करमाळा ग्रामीण व शहरातील सर्व महीला पदाधिकाऱी मोठ्या संख्येत उपस्थितीत होत्या.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

1 hour ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

7 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago