Categories: Uncategorized

दहावी बारावी नंतर पुढे काय? प्रा. रामदास झोळ फाऊंडेशन करमाळा यांच्या वतीने ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी.
करमाळा तालुक्यातील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या संपन्न झाला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन ही काळाची गरज असून प्रा.रामदास झोळ फाउंडेशन करमाळा यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील विद्यार्थि व पालकांसाठी साठी दहावी बारावी नंतर पुढे काय? याविषयी करियर मार्गदर्शन कार्यशाळा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत तुम्ही घरी बसून सहभागी होऊ शकता. यामध्ये दहावी बारावी पास झाल्यानंतर पुढे *शिक्षणाच्या कुठल्या संधी आहेत,प्रवेश प्रक्रिया कशी असते, CET कोणकोणत्या आभ्यासक्रमाला असते,प्रवेशाचे राऊंड किती व कसे असतात,स्कॉलरशिप कुणाला मिळते,कागदपत्रे कुठली लागतात* या याबद्दल चे सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये केले जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे जगाच्या स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्याचा विद्यार्थी मागे पडत आहे. या विद्यार्थ्याला योग्य दिशा मार्गदर्शन करून त्याला अपेक्षित असणाऱ्या शाखेमध्ये करिअरची योग्य दिशा मिळून, योग्य शिक्षण मिळाल्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू शकते आणि तो आत्मनिर्भर होऊन त्याच्या कुटुंबाचा उत्कर्ष करील या उद्देशाने प्रा. रामदास झोळ फाउंडेशन ने ऑनलाइन करियर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करून झूम मीटिंग द्वारे एका वेळी दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत आपले काही प्रश्न असल्यास त्या प्रश्नांची उत्तरेही दिली जाणार आहेत. करमाळा तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रा. रामदास झोळ फाऊंडेशनचा उपक्रम आहे.त्यामुळे जगाच्या स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यातील विद्यार्थी सक्षमपणे उभा राहण्यास पात्र होणार आहे. तरी *दहावी बारावीनंतर पुढे काय?* या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी नाव नोंदणी करून कार्यशाळेत सहभागी व्हावे. असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे

*नाव नोंदणीसाठी संपर्क – प्रा. रामदास झोळ फाउंडेशन संपर्क कार्यालय बारा बंगले विकासनगर करमाळा*
संपर्क – 9405314296 (कॉलिंग), 7744009095 (व्हॉटस् ॲप)

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

21 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago