करमाळा प्रतिनिधी- लोकसभेच्या माढा मतदार संघातील लढत आता जवळपास निश्चित झाली असुन महायुतीचे उमेदवार खासदार. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कामाचे जोरावर पुन्हा एकदा भाजपा व मित्रपक्षांनी टिकीट दिलेले असुन, त्यांचे विरुद्ध ऐनवेळी भाजपातुन शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधे प्रवेश केलेल्या अकलुजच्या मोहीते परिवारातील धैर्यशील मोहीते पाटील योच्यात लढत रंगली आहे. या मतदार संघातील आजपर्यंतची परिस्थिती पाहता.. मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतरच्या निवडणुकात प्रथम शरद पवार,विजयसिंह मोहीते पाटील हे अनुक्रमे खासदार झाले परंतु त्यांचे विरुद्धचे उमेदवारांनी घेतलेली मते पाहता ती विचार करायला लावणारी होती.. विजयसिंहदादांच्या विरुद्ध तर सदाभाऊ खोत यांनी काँटे की टक्कर दिली होती.त्यानंतर कालच्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बाजी मारली परंतु विरोधात असणाऱ्या संजयमामा शिंदे यांना पडलेली मते सुद्धा विजयासमीप आलेली होती. आज चित्र बदललं आहे परंतु परिस्थिती जैसे थे आहे . वस्तुतः रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मागील निवडणुकीतला असणारा अनुभव पाहता आज वर वर काहीही चित्र दिसत असले तरी निंबाळकर यांना भाजपाने दुसऱ्यांदा उमेदवारी बहाल केली त्याच दिवशी त्यांनी अर्धी अधिक निवडणुक जिंकली होती. अतिशय जिद्दी व चिकाटी असणारा निंबाळकरांचा स्वभावच त्यांना विजयापर्यंत पोहोचवेल असे वाटते. ही निवडणुक फक्त माळशिरस तालुक्याचे मतावर नाही तर माढा, करमाळा, सांगोला, फलटण, माण, खटाव याही तालुक्यातील मताना तेवढेच महत्त्व आहे,. आज माण- खटाव- सांगोला भागात पाण्यासाठी दिलेले वचन खासदार निंबाळकर यांनी पाळलेले आहे त्यामुळे तसेच पाठीराखे असणारे श्री. शहाजीबापु पाटील व दिपक आबा साळुंखे एकत्र येऊन तिथे मतरूपी करिष्मा पहायला मिळणार आहे. माढा मतदार संघात देखिल आमदार.बबनदादा शिंदे, यांचे प्राबल्य असुन.. त्याच मतदार संघात आता प्रशांत मालक परिचारक आणि कल्याणराव काळे हे दोघेही नेते यावेळी बबनदादांचे साथीने मतदारसंघात चमत्कार घडवतील. शिवाय माढयातील तानाजी सावंत यांची असणारी ताकदही महायुतीसोबतच असणार आहे. करमाळ्यात माजी आमदार नारायण पाटील वगळता आमदार संजयमामा शिंदे यांचेसह बागल गट, जगताप गट निंबाळकरांचे काम करणार हे निश्चित झालयं.. त्यामधे महायुतीतील घटक पक्ष रासप,आरपीआय व इतर संघटनांच्या मतांसह गणेश चिवटे व भाजपा टिमचे काम तसेच आरोग्य सेवेच्या व अन्य विकास कामांचे जोरावर महेश चिवटे, मंगेश चिवटे यांचे काम मतदानातून दिसणार आहे. विशेषतः करमाळा शहरामधे असणारा देवी गट भाजपासोबत राहणार असुन, सावंत गटातील सुनील सावंत यांनी अभयसिंह जगताप यांचे करीता विशेष कष्ट घेतले होते परंतु त्यांचा उमेदवारीतून पत्ता कट केल्याने त्यांची भुमिका गुलदस्त्यात आहे. परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता ते आमदार संजयमामा शिंदे यांचे सोबत राहायलाच प्राधान्य देतील असे चित्र दिसुन येते.
मतदार संघातुन यापुर्वी शरद पवार साहेब उभे होते पाच वर्षे खासदार म्हणुन राहीले पण माढयाला काहीच मिळाले नाही. ही शोकांतिका आजही लोक बोलुन दाखवितात. त्यामुळे आज जरी वरच्यावर लोक काही जरी बोलत असली तरी माढ्यात एकंदरीत परिस्थिती पाहता फक्त माळशिरस तालुक्यावर निवडणुक जिंकणे सोप्पे नाही. आता हा लढा मुळातच माळशिरस विरुद्ध माढा, करमाळा, सांगोला, माण, फलटण, खटाव असा झाला आहे. सांगोला ,माण, खटाव , फलटण मधे तर निंबाळकरांना विकासाचे जोरावर मते मागायला कोणीच रोखु शकणार नाहीत. पाणी, रेल्वे याचबरोबर रस्ते याकरीता त्यांनी हजारों कोटींचा निधी मिळविला आहे. एखादा नविन फैक्टर आला कि तेवढ्यापुरते लोकांना गुणगुणायला सोपे असते.पण ही देशाची निवडणुक आहे.देशात स्थिर सरकारची आवश्यकता आहे. देशाला सक्षम नेतृत्व असले की सर्व काही सुरळीत चालू राहते. पाच वर्षात मोदींनी भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवलेली उंची लक्षात घेता आणि प्रत्येक घटकाला दिलेला न्याय लक्षात घेता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याच पाठीशी खंबीरपणे राहणे योग्यतेचे आहे. देशात सरकार तर भाजपाचेच येणार आहे मग आपण आपला उमेदवार विरोधातील का निवडावा?.. या सरकार मधे सामील होवुन आपल्या मतदार संघामधे कामे करणाराच उमेदवार म्हणून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर यांना लोकसभेत पाठवुया!
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…