Categories: करमाळा

करमाळ्यात शनिवारी करमाळा डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेच्यावतीने ‘राजा माने’ कार्य गौरव पुरस्काराने सोहळ्याचे आयोजन


करमाळा, प्रतिनिधी-
करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या वतीने जेष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात प्रथमच डिजिटल मिडियाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नावाने आदर्श कार्य गौरव पुरस्कार करमाळा डिजिटल पत्रकार संघाने सुरू केला असून पत्रकारिता क्षेत्रातील गुरुवर्य राजा माने यांच्या प्रति असलेला प्रेमाचा हा अनमोल ठेवा असणार आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लेखणीच्या माध्यमातून समाजाची अविरत सेवा करणाऱ्या पत्रकार बांधवाचा करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना करमाळा यांच्यावतीने शनिवारी २७ एप्रिलला सकाळी १० ते २ या वेळेमध्ये तपश्री प्रतिष्ठान संचलित  गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था, नगर रोड करमाळा याठिकाणी जेष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्काराने सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ट्रॉफी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, मुख्याधिकारी सचिन तपसे तसेच डिजिटल मिडियाचे राज्य उपाध्यक्ष सतिश सावंत, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रविण नागणे, राज्य संघटक संघटक मुरलीधर चव्हाण, प्रदेश सदस्य संतोष सुर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे, बार्शी तालुकाध्यक्ष धीरज शेळके, दिनेश मेटकरी कुंदन हुलावळे आदी उपस्थित राहणार आहेत.
याकार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामा बद्दल श्रेणिकशेठ खाटेर यांना जीवन गौरव पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामा बद्दल प्रा. रामदास झोळ, युवा आयकॉन म्हणून महेश निकत, तालुका आयकॉन आणि युवानेते म्हणून ॲड अजित विघ्ने, आदर्श शिक्षक म्हणून भीष्माचार्य चांदणे यांचा ज्येष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात येणार आहे.त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा ट्राॕफी आणि सन्मानपत्र देऊन आदर्श पत्रकार म्हणून गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डिजिटल मिडीयाचे करमाळा तालुकाध्यक्ष दिनेश मडके उपाध्यक्ष शितलकुमार मोटे, गौरव मोरे, सचिव नरेंद्रसिंह ठाकूर, सहसचिव प्रज्योत गांधी, खजिनदार सचिन हिरडे, संघटक राजाराम माने, ज्ञानदेव काकडे, संपर्कप्रमुख अशोक मुरुमकर, व्यवस्थापक सुर्यकांत होनप, प्रसिद्धीप्रमुख अंगद भांडवलकर, राहुल रामदासी, नितीन झिंजाडे, सिद्धार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे, सागर गायकवाड, युवराज जगताप, धनंजय पाटील,आदीजण परिश्रम घेत असुन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले‌ आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…

13 hours ago

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

3 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago