Categories: करमाळा

देवळालीसाठी रोज पाच टँकर मंजूर शिवसेना तालुका अध्यक्ष राहुल कानगुडे यांच्या प्रयत्नाने पाण्याची समस्या सुटली

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराला लगत असलेल्या देवळाली खडकेवाडी सह वाड्यावर प्रचंड पाण्याची टंचाई होतीपिण्याच्या पाण्याचे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.यासाठी शिवसेना तालुका अध्यक्ष राहुल कानगुडे यांनी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांना निवेदन देऊन स्वतः पाणी टँकरचे प्रस्ताव कुर्डूवाडी कार्यालयात जाऊन दाखल केले होतेशिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या प्रश्न उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून हे टँकर मंजूर करून घेतले.24 हजार लिटर क्षमतेचे अडीच टँकरव  बारा हजार लिटरचे दोन टँकरअसे मिळून दररोज 84 हजार लिटर पाणी उद्यापासून देवळाली गावात शासनाच्या वतीने देण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी दिली आहे.याबाबत बोलताना राहुल कानगुडे म्हणाले की देवळाली ग्रामपंचायतीने वेळेवर प्रस्ताव दाखल केला नव्हता मी स्वतः पाठपुरावा करून प्रस्ताव दाखल केला यामुळे आज टँकर सुरू होत आहेत ग्रामपंचायतीने गांभीर्याने याची दखल घेऊन पाठपुरावा केला असता तर एक महिन्यापूर्वीच टँकर सुरू झाले असते सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्यामुळे देवळाली ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला.

++–मनोज राऊत गटविकास अधिकारी करमाळा

देवळाली येथे पाण्याची टँकर सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले असून उद्यापासून देवळाली इथे पाण्याची टँकर सुरू करीत आहोत

saptahikpawanputra

Recent Posts

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…

13 hours ago

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

3 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago