Categories: करमाळा

आमदार. संजयमामा शिंदे यांचा प्रत्येक कार्यकर्ता विकासाच्या मुद्दयावर खासदार. रणजितसिंह निंबाळकरांच्या पाठीशी खंबीर राहणार*- राजेंद्रसिंह पाटील- संचालक.सोलापुर जिल्हा दुध संघ

करमाळा प्रतिनिधी 
– सोलापुर जिल्हयाचे राजकारणात नेहमी किंगमेकरची भुमिका बजावणारे आणि राजकीय संघर्षात स्वतःचा एक वेगळा ठसा असणारे नेतृत्व हे आमदार. संजयमामा शिंदे यांचे असुन, आम्ही त्यांचे सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी मामांनी सांगितलेले धोरण पाळणार असुन खासदार. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा संसदेत पाठविणार असल्याचे वक्तव्य सोलापुर जिल्हा दुध संघाचे संचालक तथा केत्तुरचे माजी सरपंच राजेंद्रसिंह ऊर्फ अशोकराव पाटील यांनी केले. मागिल निवडणुकीत रणजितदादा जरी मामांचे प्रतिस्पर्धी राहीले असले तरी विकास कामांचे बाबतीत खासदारांनी नेहमी प्रोटोकॉल पाळुन या पाच वर्षात आमदार. संजयमामा यांना सोबत घेऊन अनेक विकासाची महत्वपुर्ण कामे मार्गी लावलेली आहेत. करमाळा तालुक्यासह माढा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण, खटाव येथील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्याचे यशस्वी काम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे. आज आशिया खंडातील सर्वात मोठी डिस्टलरी त्यांची असुन, त्यांचे कारखान्याने देखिल शेतकरी सभासदाला योग्य भाव दिला आहे. अडचणीच्या काळात करमाळा तालुक्यातील अतिरिक्त ऊसाचे गाळप देखिल त्यांनी केलेले आहे. आजपर्यंतच्या खासदारांमधे त्यांचे काम सर्वाचे पेक्षा भारी भक्कम असुन, त्यांचे मराठीसह , हिंदी, इंग्रजी भाषांवर देखिल प्रभुत्व आहे. ते एक उच्चशिषीत खासदार असुन, रणजितदादा आणि संजयमामांची जोडी भविष्यकाळात तालुक्याच्या विकासात भर टाकणारी आहे. देशात मोदींचेच सरकार येणार आहे हे निश्चित असुन आपणही या सरकारमधे राहुन आपल्या विकासकामांना चालना देणाऱ्या उमेदवाराचे पाठीशी असायला पाहीजे. आमदार संजयमामा शिंदे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांकडे या मतदार संघाचा कायापालट करण्याची धमक आहे. राज्य सरकार या दोघांचे पाठीशी खंबीर असुन मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांचे पाठीशी असुन, आगामी काळ हा करमाळा तालुक्यासह माढा मतदारसंघा करीता उज्वल काळ असणार आहे. पाच वर्ष विरोधी बाकावर बसुन बोंबलत बसण्या पेक्षा आपण सत्तेत राहणारा व कार्यकुशल असणारा आपल्या हक्काचा माणुस म्हणुन निंबाळकरांना पुन्हा एकदा विजयी करावे. यावेळी माढा मतदारसंघाला संसदेत केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची देखिल संधी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आदरणीय आमदार. संजयमामांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा घेतलेला निर्णय आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना शिरसावंद्य असुन, आमचा प्रत्येक कार्यकर्ता तन- मन-धनाने बहुसंख्य मताधिक्याने खासदार निंबाळकर यांना विजयी करतील. तसेच आजपर्यंत आमदार. संजयमामांना ज्यांनी वेळोवेळी विरोध केला आहे त्यांना अजिबात सहकार्य करू नये . असे सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

18 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago