करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा निवडणुक महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळासह माढा तालुक्यातील 36 गावांचा झंजावती प्रचार दौरा सुरू केला असून त्यांच्या प्रचार दौऱ्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रचार दौऱ्यादरम्यान आमदार शिंदे कोणत्याही राज्यकर्त्यावर टीकाटिप्पणी न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर आपण पूर्वी महाविकास आघाडी व त्यानंतर महायुती सोबत राहिलो असून करमाळा मतदारसंघाच्या विकास कामासाठी जवळपास 2500 कोटीहून अधिक निधी प्राप्त केला असल्याचे ठामपणे सांगतात. आपल्याला जर मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेसोबत रहायला हवं ही आपली भूमिका आहे.
2019 ते 2024 ही पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासातील आगळीवेगळी निवडणूक आहे. प्रारंभी सरकार स्थापन व्हायला लागलेला वेळ, त्यानंतर कोरोनामध्ये गेलेला 2 वर्षाचा काळ, सर्व स्थिरस्थावर होऊन विकास कामे सुरू असताना महाविकास आघाडीचे कोसळलेले सरकार आणि त्यानंतर विरोधात आपण घालवलेले जवळपास 1 वर्ष यामुळे करमाळा तालुक्याच्या विकासाला अडसर निर्माण झाला होता. त्यामुळे फक्त तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण अजितदादाच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये सामील झालो. पर्यायाने अवघ्या 1 वर्षात मतदार संघाला तब्बल 1 हजार कोटीहून अधिक निधी मंजूर झाला त्यामुळे तालुक्याचा शाश्वत विकास होण्यास हातभार लागत आहे ही आमदार संजयमामा शिंदे यांची मांडणी मतदारांना खूप भावत आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजना व माढा तालुक्यातील सीना माढा उपसा सिंचन योजना या दोन्ही योजना ची सुरुवात 1995 साली झाली परंतु दहिगाव उपसा सिंचन योजना तब्बल 2018 साली कार्यान्वित झाली तर सीना माढा उपसा सिंचन योजना मात्र 2001 सालीच कार्यान्वित झाली. हा नेत्याच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्यामुळे आपण फक्त विकासालाच प्राधान्य देतो. त्यामुळे विकासाला साथ द्या व कमळाला मत द्या हे आमदार संजयमामा शिंदे यांचे आवाहन मतदारांना प्रभावित करते.
चौकट –
तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी मिळाला
भूसंपादन – 70 कोटी.
अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी -350 कोटी.
जातेगाव टेंभुर्णी रस्त्यासाठी -1200 कोटी
दहिगाव उपसा सिंचन योजना – 116 कोटी
आरोग्य विभाग – 76 कोटी
राशीन जिल्हा हद्द सावडी ते वेणेगाव फाटा रस्ता – 271कोटी.
कृषी विभाग – अतिवृष्टी, सततचा पाऊस व दुष्काळी अनुदान – 347 कोटी
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…