Categories: करमाळा

गोरगरीब जनतेच्या दबलेल्या आवाजाला साथ देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच स्व. सुभाष आण्णा सावंत – डॉ. वसंतराव पुंडे

करमाळा प्रतिनिधी 
*हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य व आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक स्व. सुभाष आण्णा सावंत यांची 73 वी जयंती 1 मे रोजी ” हमाल भवन ” येथे स्व. सुभाष अण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पांजरपोळ गोशाळेला चारा वाटप करणे, उपजिल्हा कुटीर रुग्णालयात फळे व खाऊ वाटप करणे तसेच नागरिकांसाठी आरोग्य शिबिर मध्ये शुगर, बीपी, हिमोग्लोबिन आणि हृदयरोग रुग्णांची ईसीजी करून तपासणी करण्यात आली. यावेळी या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डॉ. वसंतराव पुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डॉ. हरिदास केवारे, डॉ. बाबूराव लावंड , गोपाळराव सावंत, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आप्पा सावंत, वि. सो. अध्यक्ष मनोज गोडसे, नगरसेवक राजू आव्हाड, नगरसेवक गोविंद किरवे, संचालक वालचंद रोडगे, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, पत्रकार सुनील भोसले, पत्रकार अशोक नरसाळे, पत्रकार अश्पाक सय्यद आदि उपस्थित होते.*
यावेळी बोलताना डॉ. पुंडे म्हणाले की, हमाल पंचायत करमाळा व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी सुभाष आण्णा सावंत यांची जयंती साजरी होते . यामध्ये आरोग्य शिबिर च्या माध्यमातून अनेक कष्टकरी हमाल तसेच गोरगरीब नागरिकांची तपासणी करण्यात येते आणि यातूनच खरी सेवा मिळते, यापुढेही हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड . राहुल सावंत यांनी मोठी आरोग्य शिबीर आयोजित करावी यास आमचे संपूर्ण सहकार्य राहील असे ते यावेळी म्हणाले. तसेच अण्णांनी आपले आयुष्य समाजासाठी वेचले. संपूर्ण जीवनात त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करूनच वाटचाल केली . त्यांच्या कार्याचा वारसा त्यांची पुढची पिढी सक्षम पणे चालवत आहे.
यावेळी ऍड बलवंत राऊत, विलास जाधव, प्रा. विजय रोडगे, ह भ प हनुमंत काळे, अध्यक्ष सचिन काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पांजरपोळ गोरक्षण संस्था या गोशाळेत जनावरांना हिरवा चारा नगरसेवक प्रवीण जाधव, संचालक विठ्ठल रासकर, सरपंच भोजराज सुरवसे, सरपंच भाऊसाहेब काळे, शिंगटे सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी माऊली सुरवसे, बंडू अडसूळ , माॅन्टी खराडे, मजहर पठाण, भैय्या पाटील, बबन जाधव, दिलीप चव्हाण उपस्थित होते.
तसेच उपजिल्हा कुटीर रुग्णालय करमाळा येथे रुग्णांना फळे व खाऊ वाटप सरपंच अंकुश शिंदे, संचालक विठ्ठल भाऊ शिंदे, सरपंच भाऊसाहेब काळे, अध्यक्ष सचिन काळे, नगरसेवक मनोज राखुंडे , रणजीत सावंत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार नारायण आबा पाटील, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, संचालक जनार्दन नलवडे, सरपंच आजिनाथ भागडे, यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, नगरसेवक संजय पप्पू सावंत, युवा नेते सुनील बापू सावंत, डॉ. निलेश मोटे, सरपंच श्रीराम भोगल, नगरसेवक ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड . प्रशांत बागल, शहाजी शिंगटे, आण्णा झिंजाडे, महादेव वायकुळे, सतीश मोटे, सुरेश भोगल, देवा लोंढे , डॉ. सुभाष शेंद्रे, फारूक जमादार , दिपक सुपेकर, खलील मुलाणी ,बाळू दळवी, पै. दादा इंदलकर, अलीम पठाण, संचालक शशिकांत केकान, पत्रकार जिल्हाध्यक्ष महेश दादा चिवटे, पत्रकार अलीम शेख, पिंटू मुरूमकर, सरपंच राजू रोडे, बिभीषण खरात, हवीन गायकवाड, हरिदास मोरे ,सरपंच धनंजय शिंदे, मदन शेठ देवी, ॲड. सचिन लोंढे , दिलमेश्वर सरपंच मोरे, दिलीप मिसाळ , अंकुश माने, बबन म्हस्के, उत्कर्ष गांधी, दत्तात्रय अडसूळ, विलास रोडगे , बापू चांदगुडे, बापू बेंद्रे, योगेश गानबोटे उपस्थित होते.
सदरचे आरोग्य शिबिर, फळे व खाऊ वाटप, चारा वाटप हे कार्यक्रम राबवण्यासाठी डॉ. संकेत सावंत, डॉ . दिपक केवारे, डॉ. अनुप खोसे, शरद वाडेकर, बापू उबाळे, मोहन आवटे, दादा शिंदे, बापू नलवडे, ज्ञानेश्वर गोसावी, सुनील शेळके , गजानन गावडे, गणेश काकडे , दिलीप माने , धनंजय सावंत, वैभव सावंत, प्रशांत सावंत, पप्पू रंदवे, पांडुरंग सावंत आदि जणांनी परिश्रम घेतले.

एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन होता , अगदी योगायोग म्हणजे या कामगार दिनी कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांची जयंती आहे. याचे औचित्य साधून यावेळी गोरख तात्या करकुटे यांना कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

12 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

16 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

17 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago