करमाळा प्रतिनिधी लढतयं कोण आपल्याला माहीत नाही..आपण मतदान द्यायचं आपल्या नेत्याचं बळ वाढावायचं असे मत ॲड अजित विघ्ने यांनी केले आहे.करमाळा माढा मतदार संघातील प्रचारतोफा आज थंड झाल्या. सर्व मतदार संघ ढवळुन निघाला कोणी विकासकामांवर मते मागितली तर कोणी जाती पातीवर मागितली. पण खरी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर समजुन येतयं की करमाळा माढा मतदार संघात अनेक गट तट पक्षाचे कार्यकर्ते असुन जो तो आपआपल्या नेत्याची कॉलर ताठ ठेवण्यासाठी मतदान प्रक्रीयेत सहभागी होणार असल्याचे दिसत आहे. वर वर निवडणुक काही जरी दिसत असली तरी आणि देशाचा पंतप्रधान ठरविणारी असली तरी करमाळा माढा मतदार संघात गटातटाचच राजकारण प्रभावी आहे असं प्रथमदर्शनी स्पष्ट दिसतयं. करमाळ्यातील आमदार संजयमामा शिंदे गटासह , बागल गट, जगताप गट, पाटील गट, शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गट, राष्ट्रवादी पवार साहेब गट यासह रिपाई, रासप व वंचित सह अन्य पक्षाचे कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाने प्रचाराची आपआपली ट्रिक वापरली असुन आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. कोण कुठल्या गटाचा आणि काय करणार अशा चर्चा घडतानाच आता प्रत्येक गटाचा पक्षाचा कार्यकर्ता आपआपल्या नेत्यांनी ठरविलेल्या धोरणाचे तोरण बांधायला सरसावणार आहे. या एकंदरीत परिस्थितीत गावोगावी बुथ यंत्रणा तैनात असुन आपआपले मतदान दाखविणार आहेत. मतदार संघातून मतदारांच्या प्रतिक्रिया ऐकता देशात पुन्हा मोदींचेच सरकार येणार हे बोलले जात असुन, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचे मुद्दे देखिल चर्चीले गेले आहेत परंतु आता ही चर्चा संपुन आता कार्यकर्ते आपआपल्या नेत्यांची ताकद वाढविण्यासाठी तत्परतेने पळताना दिसत आहेत. आता मतदार संघात कोणत्या नेत्याने किती कार्यकर्तां चे जाळे तयार केले आहे ते मतदानातूनच दिसुन येणार आहे.*