Categories: करमाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी माढ्यातून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा : सुनील कर्जतकर


(भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भव्य मेळावा संपन्न )
करमाळा प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी माढ्यातून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी केले आहे.भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळ्यात बूथ अध्यक्षाचा मेळावा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना कर्जतकर म्हणाले की,कार्यकर्ता ही भाजपाची ताकत आहे.आज गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळ्यातून चांगल लीड मिळेल हा विश्वास आहे.आज देशात लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत आहे.खा.निंबाळकर यांचे मत मोदींना मिळणार आहे.मी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ फिरलो असून सर्वत्र वातावरण भाजपच्या बाजूने आहे त्यामुळे खा.निंबाळकर हे एक लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी होतील.यावेळी बोलताना भाजपा नेते गणेश चिवटे म्हणाले की,खा.निंबाळकर यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील रस्ते व पाण्याचे प्रश्नांची सोडवणूक केली आहे त्यामुळे खा.निंबाळकर यासारख्या कामदार माणसाला मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या मेळाव्यास भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षा रश्मी बागल उपस्थित होत्या.यावेळी संतोष वाळुंजकर, संतोष कुलकर्णी, भगवानगिरी गोसावी,अमोल पवार,नितीन झिंजाडे आदींची भाषणे झाली.
यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे,शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, सरचिटणीस काकासाहेब सरडे, डॉ. अभिजीत मुरूमकर, विनोद महानवर, दिनेश मडके, सरपंच प्रवीण बिनवडे, दौलत वाघमोडे, सोमनाथ घाडगे, अशोक ढेरे, उमेश मगर, लक्ष्मण शेंडगे, बिभीषण गव्हाणे, रेणुका राऊत, राधिका डोके संगीता नष्टे, राजश्री खाडे , भैया गोसावी, हर्षद गाडे, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, जयसिंग भोगे, किरण शिंदे, विष्णू रंदिवे, हरिभाऊ झिंजाडे , नवनाथ नागरगोजे, नितीन निकम, नाना अनारसे, अमोल जरांडे, सयाजी जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवानगिरी गोसावी यांनी केले तर आभार अजिनाथ सुरवसे यांनी केले.या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील भारतीय जनाता पार्टीचे पदाधिकारी सर्व बूथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

5 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

6 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

1 day ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago