उन्हाची तीव्रता लक्षात घेता 139 मतदान केंद्रांवर मंडप टाकण्याची व्यवस्था करण्यात आली होती.मतदारांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरती करून शुद्धपाणी देण्याची सोय, करण्यात आली असल्याचे तहसिलदार शिल्पाताई ठोकडे यांनी सांगितले .करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये 3 लाख 17 हजार 928 मतदार आहेत. या मतदारांपैकी १ लाख 66 हजार 813 पुरुष मतदार आहेत. १ लाख 51जार 114 स्रिया मतदार आहेत. तर १० तृतीयपंथी मतदार आहेत. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एक दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आले होते, तर कोंढारचिंचोली व महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे आदर्श मतदान केंद्र उभारून या ठिकाणी सर्व यंत्रणा जबाबदारी महिला नी पार पाडली आहे. 342 मतदान केंद्रावर प्रत्येक मतदान केंद्रावर 6 कर्मचारी नेमण्यात आले होते. माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीची वतीने महायुती कडून विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर तर महाविकास आघाडी कडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये खरी लढत झाली. महायुतीकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकरिता भाजप शिवसेना मनसे घटक पक्ष तालुक्याचे आमदार त्यांच्या गटांनी लावलेली ताकद तर महाविकास आघाडीकडून करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील मोहिते पाटील गट स इंडिया आघाडी करमाळा यांनी लावलेली ताकद यामध्ये कोण सरस ठरणार मतदार राजा नक्की कुणाला कौल देणार हे येणाऱ्या चार जून रोजी कळणार असून नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार अशी एक प्रतिष्ठेची लढाई झाली असून या दोघांचेही भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. करमाळा तालुक्यात मतदानाचा आकडा पाहता घसरलेला टक्केवारीचा फटका नक्की कुणाला बसणार हे येणारा निकाल सांगणार आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…