करमाळा शहरात प्रथमच हनुमान कथेचे नियोजन अक्षय तृतीया निमित्त श्री हनुमान कथा शाश्वत भक्तीचे सनातन परंपरा

 

करमाळा प्रतिनिधी 

करमाळा तालुक्यात प्रथमच हनुमान कथेचे नियोजन करण्यात आले आहे .दिव्य ज्योति जाग्रति संस्थान एक सामाजिक व आध्यात्मिक संस्था आहे संस्थानचे संस्थापक व संचालक सर्वश्री सद्‌गुरू आशुतोष महाराजजी असुन संस्थेच्या माध्यमाने समाजाच्या सर्वांगिन विकासासाठी अनेक सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याच श्रृंखले अंतर्गत आपल्या परिसरात श्री हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मानवी जीवन श्रेष्ठ बनवण्यासाठी श्रीरामभक्त हनुमानाच्या कथाप्रसंगामधील आध्यात्मिक रहस्य उजागर केले जातील. म्हणून मानवी जीवन सार्थक करण्यासाठी शाश्वत भक्तीप्रवाह समाजात रूजवण्यासाठी कथेच्या माध्यमाने खाली दिलेले प्रश्न व अशासारख्या विविध प्रश्नांवर

समाधानकारक चिंतन प्रस्तुत केले जाईल. १) श्री हनुमान कथेनुसार रामभक्ती प्राप्त करून देणारा शाश्वत भक्तीमार्ग कोणता ?

२) भक्तीसाठी सद्‌गुरूची आवश्यकता आहे का? आहे तर पुर्ण सद्‌गुरू कसा ओळखावा ? पध्दत कोणती ?

३) श्री हनुमान कथेनुसार ध्यानाची (Meditation) शाश्वत शरण शरण जी हनुमंता। तुज आलो रामदूता ।।१।। काय भक्तीच्या त्या वाटा। मज दावाव्या सुभटा ।। धु.।।

शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ।।२।। तुका म्हणे रूद्रा। अंजनीचिया कुमरा ।।३।। समाजाला शिकवण देण्यासाठी जगत्गुरू संत तुकाराम महाराज जी हनुमंताची स्तुती करून त्या भक्तीमार्गाची मागणी करत आहेत. ज्या मार्गाने जाऊन हनुमान

रामभक्त झाले. सदर कार्यक्रमात श्री हनुमान कथाप्रसंगाच्या माध्यमाने अनेक विषयांवर गुढ चिंतन मांडले जाईल तरी आपण इष्ट मित्र व सहपरिवार उपस्थित राहुन रामभक्तीच्या शाश्वत व सनातन मार्ग प्राप्तीसाठी या दिव्य संगितमय श्री हनुमान कथा सोहळयाचा लाभ घ्यावा व आपले जीवन कृतार्थ करावे, ही नम्र विनंती.

दिनांक – ९, १० व ११ मे २०२४

वेळ- सायं. ७ ते ९.३०

स्थळ :- श्री खोलेश्वर मंदिर समोर, किल्ला वेस, करमाळा, जि. सोलापूर

टिप :- दररोज कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलानाने व समापन आरतीने होईल.

स्थानिय आश्रम – दिव्य ज्योति जाग्रति संस्थान, मोहरी रोड, हंडाळवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, मो.नं. ९६८९८९९१०८ website : www.djjs.org

* सौजन्य *

हनुमान चालीसा पठण ग्रुप , श्री खोलेश्वर आरती मंडळ, सकल हिंदू समाज करमाळा

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी मोहम्मद खान यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी  करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी हाजी मोहम्मद महेबूब खान पठाण उर्फ खान चाचा…

3 hours ago

*स्व.काकासाहेब थोबडे चषकाचे उपविजेते होत करमाळा वकील संघाने केली दमदार कामगिरी

करमाळा प्रतिनिधी- सोलापुर येथे चालु असलेल्या स्व. काकासाहेब थोबडे चषकामधे करमाळा वकील संघाने दमदार कामगिरी…

24 hours ago

प्राध्यापक डॉ. शरद जाधव यांना संगणकशास्त्राची पीएचडी पदवी

  करमाळा प्रतिनिधी  भालेवाडी (ता. करमाळा) येथील रहिवासी तथा महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, करमाळा येथे…

1 day ago

जिल्हा दिव्यांग अधिकारी दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची मुकबधीर शाळेला भेट दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत अधिकाऱ्यांचे जेवण

करमाळा प्रतिनिधी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेले दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज…

1 day ago

एन.सी.सी. हे देशसेवा व करिअर घडवण्याचे माध्यम’ -विलासरावजी घुमरे

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये एनसीसी विभागातर्फे आर्मी, वायुसेना, पोलीस भरती इत्यादी…

2 days ago