करमाळा प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज यांची १४ में रोजी करमाळ्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे.छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे.छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या करमाळा यांच्यावतीने 14 मे रोजी पोतर नाका येथे सकाळी नऊ वाजता राज्यभिषेक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यासाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. दुपारी चार वाजता छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये आकर्षक मर्दानी खेळ, दांडपट्टा तलवारबाजी याचे प्रात्यक्षिक बाल गोपाळासह युवक वर्ग उपस्थित राहून विविध प्राचीन युद्ध कलेचे दर्शन सर्व करमाळाकरांना आपल्या कलेद्वारे घडवणार आहेत.आर एस डिजे व रायगड डेकोरेशन यांचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. तरी या मिरवणुकीमध्ये तमाम शिवभक्तांनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.