करमाळा प्रतिनिधी
गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था करमाळा व शेलगाव क कृषी क्रांती शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेलगाव क येथे मोफत मोतीबिंदू शत्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग दर्शवून 105 रुग्णांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली.
या शिबिराचे उद्घाटन पाणी फाउंडेशन चे विभागीय समन्वयक सत्यवान देशमुख, तालुका समन्वयक प्रतिक गुरव, गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे श्री किसन कांबळे , बुधराणी हॉस्पिटलचे डॉ. महंमद ठसरवाला, सरपंच प्रतिनिधी आत्माराम वीर, उपसरपंच लखन ढावरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या शिबिरात 50 टक्के सवलतीच्या दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले याचा लाभ 45 रुग्णांनी घेतला ,तर 11 रुग्णांची निवड ही मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली .लवकरच या रुग्णांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया बुधराणी हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शेलगाव क कृषी क्रांती गटाचे सदस्य नवनाथ शिंदे, मेजर शंकर शिंदे, अंकुश शिंदे, बापू माने, जितेंद्र वीर, तानाजी माने,सचीन वीर,अमर शिंदे यांनी परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…