Categories: करमाळा

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाबरोबर वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी ए डी एम एसची ई बाईक आत्मनिर्भर जीवनाची गुरुकिल्ली -बाळासाहेब साबळे

करमाळा प्रतिनिधी सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग असून बदलत्या काळानुसार वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी इंधनाचा भविष्यातील ‌ संकट लक्षात घेऊन इलेक्ट्रिकल ई बाईक ही खऱ्या अर्थाने ‌ मानवाच्या आत्मनिर्भर जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे ‌ मत ए डी एम एस कंपनीचे विकास अधिकारी श्री बाळासाहेब गायकवाड यांनी व्यक्त ए. डी. एम. एस. कंपनीच्या वतीने इलेक्ट्रिकल बाईक विषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करमाळा येथील क्लासिक ऑइल कंपनी कमलादेवी औद्योगिक वसाहत करमाळा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास अहमदनगर शोरुमचे मालक श्री बाळासाहेब साबळे, निकिता अभंग मॅडम विजय खताळ यांनी आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी पुढे बोलताना श्री साबळे म्हणाले की ए डी एम एस इलेक्ट्रिकल बाईक ही खऱ्या अर्थाने मानवासाठी एक वरदान ठरणार असून रोजच्या वीस रुपयांच्या खर्चामध्ये दीडशे किलोमीटर चालणारी ही बाईक आपल्या दैनंदिन जीवनात दळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही बाईक आहे एवढी ए डी.एम एस च्या माध्यमातून दोन चाकी तीन चाकी चार चाकी गाड्यांचा प्रसार करण्याचा कंपनीचा मानस आहे. भविष्यामध्ये इलेक्ट्रिकल वाहन हेच दळणवळणाचे प्रमुख साधन असणारआहे. त्यामुळे आपण एम एस कंपनीच्या इलेक्ट्रिकल बाईक घेऊन आत्मनिर्भर स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग निवडला पाहिजे.यामुळे आपणास वैयक्तिक फायद्याबरोबर रोजगार व व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.कंपनीच्या माध्यमातून आपण ग्राहक म्हणून गाडी बुकिंग केल्यानंतर आपणाला कंपनी त्याचे बोनस म्हणून पैसे देणार आहे. आपण यामध्ये आपल्या मित्र परिवाराला या परिवारामध्ये सहभागी करून त्यांना गाडी बुकिंग केल्याबद्दलही त्याचाही लाभ आपणास मिळणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने या माध्यमातून एकामेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या भावनेतून काम असणार आहे. सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग मिळणार आहे.ADMS इलेक्ट्रिक बाइक अधिक माहितीसाठी पत्रकार दिनेश मडके मोबाईल नंबर 9272993941 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.या कार्यक्रमास एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने, क्लासिक ऑइल कंपनीचे मालक उद्योजक संतोष काका कुलकर्णी,सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर, कमलादेवी ॲाप्टिकल्सचे मालक सुरेश चाळक, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर उद्योजक गणेश ममदापूरे शिवकुमार चिवटे, सुहास काळे पाटील,आयुब शेख पत्रकार दिनेश मडके, सुर्यकांत होनप,शुभम कुलकर्णी, शंकर कुलकर्णी  सिध्देश्वर डास यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…

1 hour ago

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…

6 hours ago

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

9 hours ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

1 day ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

1 day ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago