–करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात नेत्यांची आपसात श्रेयवादासाठी स्पर्धा चालू असुन जनतेच्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.ऐन उन्हाळ्यामध्ये करमाळा तालुक्यात भिषण पाणी टंचाई असताना करमाळा तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याचे टॅकर प्रशासनाकडून सुरू आहेत. करमाळा तालुक्यातील निम्म्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे .प्राध्यापक रामदास झोळसर यांनी गेल्या सहा वर्षापासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून मागेल त्या गावाला मोफत पाणी पुरवठा करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपुले साधू ओळखावा देव तेथिची जाणावा या म्हणीप्रमाणे समाजसेवेला वाहुन घेऊन लोकांसाठी सदैव कार्यरत असलेले प्राध्यापक रामदास झोळ सर खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्याचे संवेदनशील,जागरूक, संकटसमयी धावून जाणारा लोकनेता म्हणून प्रभावीपणे काम करीत आहेत. उन्हाळा सुरू झाला की पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाचे टॅंकर धावू लागतात. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पाणी योजना राबवूनही टॅंकरमुक्तीच्या घोषणा फोल ठरत आहेत. दिवसेंदिवस उन्हाळ्यात टॅंकरची संख्या कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढतच आहे. केवळ शासकीय योजना राबवायची म्हणून कामे केली जातात. मात्र त्याचा उपयोग न होता अशा योजना निकामी ठरतात. अशा योजनांना कंटाळलेल्या ग्रामस्थांना करमाळा तालुक्याचे कर्तृत्व दातृत्व नेतृत्व याचा अनोखा संगम असलेले दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर सर स्वःखर्चांने गेली सहा वर्षे उन्हाळ्यातील चार महिने टॅंकरने पाणी पुरवठा करीत आहेत.केवळ सामाजिक भान ठेवत त्यांनी तहानलेल्याची तहान भागवण्याचे काम केले आहे. यासाठी कुणाकडून एकही रुपया न घेता हा लाखो रुपयांचा खर्च प्राध्यापक रामदास झोळसर यांनी स्वतः हा करावयाचे ठरविले असून अविरतपणे हे काम चालू आहे. यासाठी त्यांना आई वडील यांचे संस्कार धर्मपत्नी सौ माया झोळमंडम यांचे प्रोत्साहन उपयोगी पडल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…