दहिगाव उपसासिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणाली द्वारे सुरू असलेल्या कामाची आ. संजयमामा शिंदे यांचेकडून पाहणी


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणाली कामाचा शुभारंभ डिसेंबर २०२३ मध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झालेला होता. या कामाची प्रगती कितपत झालेली आहे याची प्रत्यक्ष पाहणी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज दिनांक १७ मे २०२४ रोजी केली. यावेळी त्यांच्यासोबत दहिगाव उपसा सिंचन योजना अर्थातच कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२ चे उपाभियंता एस.के. अवताडे, कनिष्ठ अभियंता सोहम कांबळे, आ. संजयमामा शिंदे गटाचे सुजिता तात्या बागल, केशव दास, सौंदे चे उपसरपंच उमेश वीर, कन्स्ट्रक्शन चे राजमाने, लोंढे आदी उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना ही अतिशय महत्वाची योजना आहे. या योजनेची उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर २४ गावातील १०५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतकरी सर्वांगीण दृष्ट्या विकसित होणार असून ही योजना पूर्ण करण्यासाठी आमदार शिंदे यांचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज असून शेतीचे नुकसान होणार असल्यास त्याचे पंचनामे करून भरपाई दिली जाणार आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.

चौकट –
दहिगाव योजनेची तांत्रिक बाजू –
१) वार्षिक एकूण पाणी वापर :- १.८१ टीएमसी
२) एकूण लाभक्षेत्र : अ) पिक क्षेत्र १३३३५ हेक्टर
ब) लाभक्षेत्र – १०५०० हेक्टर
३) लाभक्षेत्रातील एकूण गावे: २४ (ता. करमाळा, जि. सोलापूर)
मूळ प्रशासकीय मान्यता :- या योजनेच्या रु. ५७.६६ कोटी खर्चास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी निर्णय क्र. २९६/१४८ (१९९६) प्रशा-३/दिनांक १०/१०/१९९६ अन्वये प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.
सुधारीत प्रशासकीय मान्यता :- योजनेच्या संकल्पनामध्ये झालेले बदल व दरांमध्ये झालेली वाढ याचा विचार होऊन (१३९/०८) मोप्र. १ मंत्रालय, मुंबई दि. २७/०२/२००९ अन्वये प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.
द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता: सदर प्रकल्पास शासन निर्णय क्र. सुप्रमा-०९२०/प्र.क्र. (२८६/२०२०) /मोप्र-१ दि. २०/१०/२०२१ अन्वये रु. ३४२.३० कोटी किमतीस द्वितीय सुधारित मान्यता प्राप्त आहे.

चौकट –
बंदनलिका वितरण प्रणालीचे काम प्रगतीपथावर – एस. के .अवताडे. उपअभियंता कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२.
दहिगांव उपसा सिंचन योजनेच्या २७ लघुवितरिका पैकी डावी लघुवितरिका क्र.३, उजवी लघुवितरिका ३ व उजवी लघुवितरिका क्र. ८ चे बंद नलिका वितरण प्रणालीचे काम चालू असून जून २०२४ पर्यंत या ३ लघुवितरिका पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
याद्वारे योजनेवरील सौंदे, साडे, हिसरे, फिसरे, सालसे, शेलगाव (क), अर्जुननगर, पांडे, सरपडोह, कुंभेज, कोंढेज, जेऊर, वरकटणे, लव्हे इ. गावांतील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

1 hour ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

4 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

4 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

5 hours ago

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

2 days ago