Categories: करमाळा

दत्तकला आयडियल स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेजची सलग ९ वर्षे उज्वल यशाची परंपरा कायम ; इयत्ता १२ वी चा १००% निकाल

करमाळा प्रतिनिधी दत्तकला आयडियल स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेजची सलग ९ वर्षे उज्वल यशाची परंपरा कायम  दत्तकला आयडियल स्कूल ॲन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ चा इयत्ता १२ वी चा निकाल सलग ९ वर्षे १०० टक्के लागला आहे.१०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे असे संस्थापक संस्थापक अध्यक्ष श्री.रामदास झोळ सर यांनी सागितले.प्रशालेचे यशवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे.

१) सोनवलकर शर्वरी विठ्ठल:- ८३.००%
२) तांबोळी सानिया जाफर:- ८२.६७%
३) चौधरी यशराज गोरख:- ८२.५०%
प्रशालेचे तब्बल २६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह,३३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत.

या यशासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शना बरोबर दर महिन्याला टेस्ट सिरीज,सिईटीचे मार्गदर्शन, गेस्ट लेक्चर, क्षेत्र भेट, पेपर संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले या कॉलेज मध्ये 200 मार्काचा क्रॉप सायन्स विषय असून बोर्ड परीक्षेमध्ये 19 विद्यार्थांना 190 पेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत अशी माहिती प्राचार्य श्री. विजय मारकड सरांनी दिली.
त्यापैकी १) पाटील प्रगती प्रवीण (१९४ मार्क)
२) पवार महेश दत्तात्रय (१९३ मार्क)
३) गिरिगोसवी ऋतुजा सिद्धेश्वर(१९२ मार्क)
या यशाबद्दल पालक वर्गातून आनंद आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.रामदास झोळ सर, उपाध्यक्ष श्री.राणादादा सुर्यवंशी साहेब, सचिवा सौ. माया झोळ मॅडम, स्कूल डायरेक्ट सौ.नंदा ताटे मॅडम, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.डॉ. विशाल बाबर सर, स्कूलचे प्राचार्य श्री. विजय मारकड सर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago