करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांना करणार असून या नुकसान भरपाईसाठी साठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी सांगितले शेटफळ तालुका करमाळा येथील नुकसान केळी पिकाची पाणी करून या शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या यावेळी त्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना मोबाईल वरून फोन करून या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या यावेळी त्या म्हणाल्या की कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या असून जे शेतकऱ्याचे पंचनामे राहिले असतील त्यांनी महसूल व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
श्री बागल यांनी शेटफळ येथील पांडुरंग नाईक नवरे धनाजी नाईकनवरे हंबीरराव नाईकनवरे प्रमोद पोळ, नानासाहेब पोळ साहेबराव पोळ यांच्या नुकसान झालेल्या ठिकाणी भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर बाजार समितीचे माजी संचालक चिंतामणी जगताप शेटफळ येथील मुरलीधर पोळ, वैभव पोळ , अशोक पोळ, वैभव नाईकनवरे, विशाल नाईकनवरे, महेश पोळ, नानासाहेब पोळ, मनोहर वीर,चेतन पोळ, लहू पोळ, ज्ञानेश्वर पोळ,तन्मय जाधव ॠषिकेश पोळ यांच्यासह या परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…