Categories: करमाळा

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षासाठी बी.बी.ए. व बी.सी.ए कोर्सना महाविद्यालय स्तरावर सीईटी घेण्यास परवानगी देण्याचीउच्च शिक्षण संस्था चालकांची सेवाभावी संस्थेची मागणी

करमाळा प्रतिनिधी बारावीनंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षासाठी बी.बी.ए. व बी.सी.ए कोर्सना महाविद्यालय स्तरावर सीईटी घेण्यास परवानगी देण्याची मागणी उच्च शिक्षण संस्था चालकांची सेवाभावी संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे., सन २०२३-२४ वर्षाअखेरपर्यंत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बी.बी.ए. व बी.सी.ए. या पदवीस प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर प्रवेश दिला जात होता. तथापी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सदरचे सर्व कोर्सेस एआयसीटीकडे संलग्न व रजिष्ट्रेशन करणेबाबत आपल्या स्तरावर आदेश झालेले आहेत. ज्या महाविद्यालयाने एआयसीटीकडे नोंदणी केलेली आहे व ज्यांना एलओए (Letter of Approval) एआयसीटीने मंजूर केलेले आहेत अशा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपल्या स्तरावरून सीईटी घेण्यात आलेली आहे.यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी एआयसीटीच्या घेण्यात आलेल्या सीईटीकडे गांभीर्यान घेतलेले नाही. अतिशय थोडया विद्याध्यांनी आपल्या स्तरावरील सीईटी दिलेली आहे यामुळे महाविद्यानपाच्या प्रथम वर्षाच्या वर्गासाठी अत्यंत कमी विद्यार्थी प्रवेश घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षासाठी महाविद्यालय स्तरावरती सोईटी चंचून प्रवेश देण्यास मान्यता द्यावी. यामुळे ग्रामीण भागातील विद्याथ्यांना कमी फीमध्ये संगणक विषयाचे ज्ञान घेता येईल व महाविद्यालयांना सदरचा कोर्स चालविणे आर्थिकदृष्टया परवडणे शक्य होईल. सदरच्या विनतीचा विचार करून आपल्या स्तरावर योग्य ते आदेश संबंधीत विद्यापीठांना व महाविद्यालयांना कळवून सहकार्य करावे असे आवाहन उच्च शिक्षण संस्था चालकांची सेवाभावी संस्था, सोलापूर अध्यक्षा पद्म‌जादेबी प्रतापसिंह मोहितेपाटील कार्याध्यक्ष बाबुराव गायकवाड सचिव जयप्रकाश बिले सर खजिनदार मनोहर सपाटे यांनी केली आहे.

 

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

12 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

16 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

17 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago