करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला इंटरनॅशनल स्कूल या विद्यालयाचा यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला असून भिगवन विभागामध्ये कुदळे श्रावणी कृष्णा या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदासजी झोळ सर यांनी दिली.
सन 2024 मध्ये या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताना विद्यालयांमध्ये टेस्ट सिरीज वेळेवर घेण्यात आल्या. बोर्डाचा पेपर कसा सोडवायचा यासाठी तज्ञ मार्गदर्शकाला बोलवून त्यांचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले. मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या जात होत्या. तसेच प्रश्नपत्रिका संच सोडवून घेतले जात होते .शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे ज्यादा तास घेऊन त्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न येथील शिक्षकांनी केला अशी माहिती प्राचार्य सौ सिंधु यादव यांनी दिली
सेमी इंग्लिश विभागाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
1 कुदळे श्रावणी कृष्णा – 96.80 %
2.गाडे मनस्वी मनोज – 82.00 %
3 सूर्यवंशी सुहास नवनाथ -76.20%
4 इवरे ओमकार विठ्ठल – 76.20%
गुण मिळवून पास झाले .
विद्यालयात प्रथम आलेली कुदळे श्रावणी या विद्यार्थिनीला समाजशास्त्र 99, गणित 99 ,विज्ञान 99, इंग्रजी 94, हिंदी 94 ,मराठी 91, एवढे गुण मिळवून ही विद्यार्थिनी यशस्वी झाली.
इंग्लिश विभाग
1. शिंदे श्रावणी श्रीपाद 92.20%
2. गावडेअथर्वाजनार्दन92.00%
3.मानकर अंकिता नितीन 87.80 % गुण मिळवून पास झाले .
वरील सर्व विद्यार्थ्यांचे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदासजी झोळ सर उपाध्यक्ष श्री राणा दादा सूर्यवंशी साहेब, सचिव सौ माया झोळ मॅडम सीईओ डॉ विशाल बाबर सर स्कूल विभागाच्या डायरेक्टर सौ नंदा ताटे मॅडम यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूलच्या प्राचार्य सौ सिंधु यादव् मॅडम विभाग प्रमुख खाडे मॅडम विभाग प्रमुख धेंडे सर सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…