अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांचे तर्फे करमाळा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती १४१ वी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्यातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले प्रतिमापूजन हभप पुराहित घुगेमहाराज भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके, पुरोहित रवींद्र विद्वत अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना शाम सिंधी की सावरकर हे थोर राष्ट्रभक्त, प्रखर विज्ञानवादी बुद्धिवंत होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी आपल्या आयुष्याची आहुती देऊन राष्ट्रनिष्ठेशी कोणतीही तडजोड केली नाही, अत्यंत धैर्याने विपरीत परिस्थितीत ब्रिटिशांशी त्यांनी सशस्त्र संघर्ष केला. त्यांचा आदर्श ठेवून देव देश आणि धर्मासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी जागृत आणि गरजेचे आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी लवकरच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास संतोष काका कुलकर्णी शाम सिंधी, नरेंद्रसिंह ठाकुर,उपाध्यक्ष रवींद्र विद्वत पत्रकार दिनेश मडके, हरीभाऊ कुलकर्णी,नरेंद्र सिंह ठाकुर शंकर कुलकर्णी , सचिन कुलकर्णीगुरुजी, आनंद पाटील सर सिध्देश्वर डास मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…