Categories: Uncategorized

खासदार निंबाळकर यांचा करमाळा दौरा : उजनी दुर्घटनेतील कुटुंबीय व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट


करमाळा प्रतिनिधी – माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दिनांक 27 मे रोजी करमाळा दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी कुगाव येथे उजनी जलाशयात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या डोंगरे व अवघडे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली. शासन दरबारी प्रयत्न करून दुर्घटनाग्रस्त जाधव, अवघडे कुटूंबीयांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी कुटुंबीयांना दिली, तसेच करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत लवकरात लवकर नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करावे अशा सूचना दिल्या,
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे , चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे, वाशिंबेचे सरपंच तानाजी बापू झोळ, उपसरपंच दादासाहेब सरडे, गणेश काळे, सचिन गायकवाड, दीपक गायकवाड यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

18 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago