शारदादेवी महादेव कारंडे यांचा जन्म 1 जुन 1949 साली लोणंद या गावाजवळील सुखेड येथे मामाच्या गावी झाला. वडील शेतकरी मुढाळे तालुका बारामती येथे त्यांचे राहते माहेर मूळ गाव आहे पहिली ते सातवी पर्यंत चे शिक्षण गावात पूर्ण केल्यानंतर सातवीनंतर पी टी सी करून प्राथमिक शिक्षिका झाल्या .1969 ला जिल्हा परिषद शाळा नंबर ५ येथे फलटण येथे नोकरी सुरू केली. नोकरी करत असताना त्यांचा विवाह 1969 झाली चित्रकला शिक्षक महादेव कारंडे यांच्याशी झाला ते सदाशिव माने विद्यालय येथे अकलूज येथे कार्यरत होते .दोघांनीही नोकरी करत आपला संसाराचा गाडा ओढण्याचे काम केले. शारदा देवी फलटणला तर महादेव कारंडे अकलूजला आठवड्यातून दोन दिवस कौटुंबिक सहवास त्यांना मिळाला. त्यांच्या संसार वेलीवर दोन मुले एक मुलगी अशी अपत्ये त्यांना झाली थोरला मुलगा शिवमुर्ती याचा जन्म 1970 साली झाला.त्याला चांगले शिक्षण दिल्यानंतर तो भारतीय सैनिक दलात भरती झाला असून सध्या लद्दाख येथे कर्णल म्हणून काम करत आहे .तर दुसरे चिरंजीव डॉक्टर विक्रम कारंडे यांचा जन्म 1972 साली झाला असून तो व्यवसाय करत आहे.तिसरी मुलगी कन्या गीता हिला त्यांनी उच्चशिक्षित केले असून ती इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून सध्या शिवाजीनगर पूणे येथे नवले महाविद्यालयमध्ये नोकरी करीत आहे.गीता ही मुलगी . तिच्या पतीसह मुलगा हर्षवर्धन यांच्याशी सुखी संपन्न आयुष्य जगत आहेत.आईनी दिलेल्या शिकवणी संस्कारामुळे आयुष्याचे सार्थक झाले आहे असल्याचे गीताताई यांनी सांगितले आहे.आपले कुटुंब सुखी संपन्न करत असतानाही आपले मुले सांभाळत सासर कडच्या मंडळीची जबाबदारी त्यांनी एका मातेप्रमाणे समर्थप्रणाने पार पाडली. त्यांचे सासरे मोठे शेतकरी होते. त्यांना चार मुले व सहा मुली असा मोठा परिवार होता एकत्र कुटुंब पद्धती असल्याने घरची सर्व जबाबदारी थोरली सून या नात्याने शारदा देवी यांनी पार पाडली .थोरला दिर शंकर शेती करीत आहे. दुसरा दिर तुकारामला ग्रॅज्युएशन केले तो बँकेत पुणे येथे नोकरी करत असून सध्या तो कुटुंबासह अमेरिकेमध्ये स्थानिक आहेत. तिसरा दिर ज्ञानेश्वर शिल्पकार म्हणून मुंबई येथे आहेत तर सहा नंदांचाही त्यांनी त्यांना योग्य शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभ्या करण्यासाठी आत्मनिर्भरतेचे धडे त्यांनी दिले .त्यापैकी 3 नंदा हयात आहेत असून त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुखी संपन्न जीवन जगत आहेत. तर तीन नंदा मयत आहेत. महादेव कारंडे यांचे पती हे उत्कृष्ट चित्रकार होते कला महर्षी म्हणून त्यांना अनेक पुरस्काराने त्यांचा शासन व अनेक सामाजिक संस्थेचे वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. महादेव कारंडे कारंडे यांनीही संसारात सुख दुःख पचवून आपली पत्नी शारदा देवी हिला मोलाची साथ दिली आहे. त्यांचा स्वभाव थोडासा तरकटी ,शिस्तप्रिय , हजरजबाबी असल्याने शारदादेवीची मोठी कसरत झाली परंतु कठीण नारळामध्येच गोड पाण्याचा झरा असतो. या म्हणण्याप्रमाणे शारदादेवींनी महादेव कारंडे यांच्याबरोबर आनंदाने संसाराचा गाडा ओढला हे करत असताना पतीच्या बाबतही त्यांनी कधी त्यांच्याशी तक्रार न करता गर्वाने मला त्यांचा अभिमान असल्याचे सांगितले .कलाकार माणसे थोडी वेडी असतात पण खऱ्या अर्थाने कठीण नारळाखाली गोड पाणी व गोड खोबऱ्याचा आनंद आपल्याला मिळत असतो संसारात सर्व गोष्टी जरी मिळाले तरी.सुखी संप्पन जीवन जगण्यासाठी दोन्ही चाकांची भुमिका महत्त्वाची आहे . त्यामुळे एकमेकाला समजून घेतले तर खऱ्या अर्थाने सुखी संसार होतो असे त्यांनी सांगितले 2010 साली ते करमाळा येथे वास्तव्यास आले येथे राहून त्यांनी करमाळा हीच कर्मभूमी मानुन जीवन जगू लागले. भाऊची नोकरी सुटल्यावरही कला जोपासण्यासाठी त्यांनी पेंटिंगचे काम सुरूच ठेवले. पण काही सर्व काही व्यवस्थित असताना त्यांचा अचानक अपघात झाला भाऊचा पाय फ्रॅक्चर झाला व त्यांना व्हीलचेअरवर आपले आयुष्य काढावे लागले. यावेळी भाऊचे आजारपण त्यांची सेवा करण्याचे काम शारदा देवीने केले.पती महादेव कारंडे भाऊचे 3 फेब्रुवारी 2019 साली हृदयविकाराने अचानक दुःखद निधन झाले .कुटुंबावर एवढा मोठा आघात झाला एवढे संकट येऊनही शारदा देवीने न डगमगता संसाराचा गाडा खंबीरपणे चालवला. त्यामुळे लग्न झाल्यावरही सून ,दिरासह मुलांची व लहान नातीची जबाबदारी त्यांच्यावर पडली त्यामध्येच नातीचे अल्पशा आजाराने तिचे निधन झाले एवढे सगळे दुःख पचवून त्यांनी शारीरिक व्याधीना तोंड देत कुठलीही तक्रार न करता जीवन जगणे चालू होते. अचानक त्यांना किडनीचा त्रास झाला व 2017 साली त्यांची किडनीचे ऑपरेशन झाले .सध्या एका किडनीवर असून सदैव हसतमुख प्रेमळ समाजाच्या म्हणून त्या परिचित आहे .दिनांक 1 जून 2024 रोजी त्या 75 वर्षात प्रवेश करत आहेत मुलांची कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडत मुलांसाठी करमाळा तालुक्यातील रोशेवाडी येथे दोन एकर जागेवर आंब्याची केशर बागही त्यांनी फुलवली आहे म्हसवड येथेही त्यांची बागायत शेती आहे .त्या स्वावलंबी जीवन जगत असून आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करीत राहुन आलेल्या प्रसंगाला तोंड दिल्यानंतर परमेश्वर नक्की साथ देतो त्यामुळे प्रामाणिकपणे परमेश्वराचे आभार मानून आनंदी जीवन जगण्याचा संदेश त्यांनी दिला आहे .सर्वांनी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहावे व स्वावलंबी जीवन जगण्याचा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला आहे. आदर्श माता, शिक्षिका, माता, पत्नी, भावजय,आजी, सासू आशा भूमिका बजावणाऱ्या शारदा देवी कारंडे यांच्या कार्याला मनापासून सलाम स्त्रीशक्ती हिच राष्ट्र शक्ती दुर्गाशक्ती आहे.शारदादेवी महादेव कारंडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा…..1 जुन रोजी कारंडे निवास कमलादेवी औद्योगिक वसाहत येथे सायंकाळी सात वाजता अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. त्यासाठी आपण उपस्थित राहावे असे आवाहन कारंडे परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.